Devendra Fadnavis Speech : अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या मैत्रीत फरक काय? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Political News : जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा एकनाथ शिंदे जन्म घेतील, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
Devendra Fadnavis on ajit pawar and eknath shinde
Devendra Fadnavis on ajit pawar and eknath shindeSaam TV

सूरज मसूरकर

Mumbai News : भाजपवर सातत्याने पक्ष फोडण्याचे आरोप होतात. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, लोक म्हणतात तुम्ही पक्ष फोडला, घर फोडलं. मी म्हणतो की सुरुवात कोणी केली. जनादेशाचा अपमान कुणी केला?

अजित पवार आणि एकनाथ शिंदे छोटे नेते आहेत का? की मी काही मोहिनी टाकेल आणि ते इकडे येतील? पण मी एक सांगते की जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा एकनाथ शिंदे जन्म घेतील, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या मैत्रिबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, एकनाथ शिंदेंसोबतची आमची मैत्री भावनिक आहे. तर अजित पवार यांच्या सोबतची आमची मैत्री राजकीय आहे. भविष्यात तेही भावनिक मित्र होतील, असंही त्यांनी म्हटलं.

सर्वांना एकत्र घेण्याची गरज, पण...

जगाच्या पाठीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी नाव केलं आहे. गरिबी कमी केली. आज सगळे लोक मोदींजींच्या विरोधात एकत्र येत आहेत. तेव्हा सर्वांना एकत्र घेणे गरजेचं. जे येतील त्यांना घेऊ. पण काँग्रसचे विचार चालणार नाही. ते विचार तुष्टीकरणाचे आहेत. एमआयएमला कधी सोबत घेणार नाही, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com