Devendra Fadnavis  saam tv
मुंबई/पुणे

ओबीसी बांधवांचा विजय झाला; सुप्रीम कोर्टाच्या निकालावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

'आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की आमच्या सरकारने सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणात अहवाल स्वीकारला आहे.'

साम टिव्ही ब्युरो

भूषण शिंदे

मुंबई : 'आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की आमच्या सरकारने सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणात अहवाल स्वीकारला आहे. त्यामुळे पुढच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणानुसार होणार आहेत. हा ओबीसी बांधवांचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ओबीसी आरक्षणावर दिली. (Devendra Fadnavis News In Marathi )

सुप्रीम कोर्टाकडून ओबीसी समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. ओबीसी आरक्षणावर (OBC Reservation) आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. त्यात बांठिया आयोगाच्या अहवालानुसार निवडणूक घेऊन उर्वरित निवडणुकांचा कार्यक्रम २ आठवड्यात जाहीर करा,असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आगामी निवडणुका ओबीसी आरक्षणानुसार घ्या, असेही निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहे.

या निर्णयावर देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, 'ठाकरे सरकार आल्यावर कोर्टाने आदेश दिला की, ट्रिपल टेस्ट करा आणि इम्पेरिकल डेटा गोळा करा. पण ठाकरे सरकारने १५ महिने काहीही केले नाही आणि केंद्राकडे बोट दाखवले. त्यामुळे कोर्टाने सांगितलं की ते सरकार गंभीर नाही'.

फडणवीस पुढे म्हणाले, मी तेव्हा भूमिका घेतली आणि सांगितले की सरकारने इम्पेरिकल डेटा करावा लागेल. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही कारवाई केली नाही. जूनमध्ये काही सदस्यांची त्यात नियुक्ती झाली. त्यावेळी मी पुन्हा सांगितलं की जोपर्यंत इम्पेरिकल डेटा जमा केल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही. त्यानंतर ३ मार्च २०२२ रोजी राज्य सरकारने कोर्टात अहवाल सादर केला. त्यावर कोर्टाने ताशेरे मारत अहवाल नाकारला.

त्यानंतर आयोगाने स्वत: सांगितलं की, तो अहवाल आम्हाला माहित नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की, बांठिया आयोग नेमा. त्यानंतर हा सर्व्हे पूर्ण करण्यात आला. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही तातडीने यावर बैठक घेतली. सांगितलं की, कुठल्याही परिस्थिती डेडलाईन चुकवायची नाही आणि १२ तारखेला अहवाल सादर झाला पाहिजे. मी स्वत: सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया यांना भेटून विनंती केली. एका आठवड्याची तारीख दिली ती आजची आहे'.

'सुप्रीम कोर्टाने अहवाल स्वीकारला आणि आरक्षण दिले आहे. आम्ही त्यांना विनंती केली होती की, सध्या पुराची परिस्थिती आहे म्हणून मान्सूननंतर आपण निवडणूक घ्या. मला विश्वास आहे की, निवडणूक आयोग विचार करेल. ओबीसी आरक्षणासाठी ज्यांनी सहभाग दिला आहे, अगदी छगन भुजबळ साहेबांचे देखील आभार मानतो. समस्त ओबीसी समाजाचे अभिनंदन करतो', असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aaditya Thackeray: दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; वरळीतून आदित्य ठाकरे तिसऱ्यांदा आमदार

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातील २१ विधानसभा मतदारासंघाचा निकाल पाहा एका क्लिकवर

मनसेला आणखी एक धक्का, शिवडीत बाळा नांदगावकरांचा पराभव

Dheeraj Deshmukh: लातूर ग्रामीणमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का, धीरज देशमुख यांचा पराभव

Vastu Tips : घराची तोडफोड न करताही दूर होऊ शकतो वास्तूदोष, जाणून घ्या सोपे उपाय

SCROLL FOR NEXT