Chief Minister Oath Ceremony Invitation Card Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra CM Oath Ceremony : ठाकरेंच्या शिवसेनेनं डिवचलं, शपथविधीच्या पोस्टरच्या बाजूला बॅनर, EVM वर प्रश्न

Maharashtra CM Oath Ceremony : मुंबईमध्ये शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्री आणि २ उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहे. महायुतीकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. पण त्याच पोस्टरच्या बाजूला ठाकरे गटाकडून लावण्यात आलेल्या पोस्टरची चर्चा सुरू आहे.

Namdeo Kumbhar

Devendra Fadnavis oath ceremony : देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे ३१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. आझाद मैदानात पार पडणाऱ्या शपथविधीला आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. आझाद मैदान परिसरातील तयारी अंतिम टप्प्यात आहे. या संपूर्ण परिसराचा कायापालट करण्यात आला आहे. दरम्यान शपथविधीनिमित्त मोठी बॅनरबाजी देखील महायुतीकडून करण्यात आली आहे. मुंबईमध्ये महायुतीकडून शपथविधीसाठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. मुंबईमध्ये ठकरेंच्या शिवसेनेकडून शपथविधीच्या बॅनरच्याच बाजूला बॅनर लावून डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. EVM वर प्रश्न विचारत ठाकरेंच्या शिवसेनेकडून खोचक टोला लगावलाय.

देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीच्या पोस्टरच्या बाजूला शिवसेना ठाकरे गटाचे पोस्टर लावण्यात आलेय. ईव्हीएम संदर्भात प्रश्न उपस्थित करत ठाकरेंच्या शिवसेनेकडून पोस्टर लावण्यात आले आहेत. अॅप्पल, गुगल, फेसबुक सारख्या टेक्नॉलॉजी जगाला देणाऱ्या अमेरिकेत ईव्हीएमवर निवडणुका होत नाहीत. मग भारतातच ईव्हीएमचा हट्ट का? असा पोस्टरवर सवाल उपस्थित करत ठाकरे गटाने महायुतीला डिवचले आहे.

मुंबईमध्ये शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्री आणि २ उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहे. महायुतीकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. पण त्याच पोस्टरच्या बाजूला ठाकरे गटाकडून लावण्यात आलेल्या पोस्टरची चर्चा सुरू आहे. सॅमसंग, एलजी यासारख्या टेक्नॉलॉजी कंपनी जगाला देणाऱ्या दक्षिण कोरियातही ईव्हीएममध्ये निवडणुका होत नाहीत. मग भारतातच का हट्ट? ईव्हीएम बाबत सवाल उपस्थित करत शिवसेना ठाकरे गटाचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी पोस्टर लावले आहेत.

Maharashtra CM Oath Ceremony

महायुतीचा शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीसंह देशभरातील २२ मुख्यमंत्री येणार असल्याचं समजतेय. महाराष्ट्रातील विरोधीपक्ष नेत्यांनाही शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आलेय. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आलेय. ठाकरे शपथविधी सोहळ्याला येणार का? याबाबत राजकीय चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

Shocking News : तरूणीसोबत घडली विचित्र घटना, बाथरूममध्ये आंघोळीला गेली अन् कोपऱ्यातलं दृश्य बघून हादरलीच!

निवडणुकीचं बिगुल वाजलं! माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षाची पहिली यादी जाहीर, प्रसिद्ध गायकाला मिळाली उमेदवारी

Relationship Tips: सारखं भांडण होतं; नातं घट्ट करण्यासाठी जोडीदारानं कराव्यात या खास गोष्टी

SCROLL FOR NEXT