'आजचा बंद म्हणजे, सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद;' देवेंद्र फडणवीसांच राज्य सरकारवर टीकास्त्र SaamTV
मुंबई/पुणे

'आजचा बंद म्हणजे, सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद;' देवेंद्र फडणवीसांच राज्य सरकारवर टीकास्त्र

तसंही या सरकारच नावच, बंद सरकार आहे...

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आज राज्यात महाविकास आघाडी MVA goverment सरकारने पुरारलेला जो बंद आहे तो बंद सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद Government Sponsored Terrorism असल्याची घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी केली आहे. महाविकास आघाडी प्रयोजित आंदोलनामुळे महाविकास आघाडीचा ढोंगीपणा समोर आला असून लखीमपूरच्या Lakhimpur घटनेमुळे महाराष्ट्र बंद केला जातो पण महाराष्ट्रातील सरकार अभूतपूर्व अडचणीत असताना, शेतकऱ्याला कोणतीही मदत दिली नाही, कर्ज माफी, आपत्ती मदतीच्या घोषणा हवेत विरल्या असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली. (Devendra Fadnavis criticizes the state government)

हे देखील पहा -

घटक पक्षातल्या लोकांना म्हणावं लागलं, भाजप BJP काळात बरी मदत मिळायची मावळला Maval शेतकऱ्यांवर गोळीबार Firing On Farmer करणारं हे सरकार आहे , त्यांना नैतिक अधिकार आहे का हे आंदोलन करण्याचं असा सवाल देखील त्यांनी आज उपस्थित केला आहे. आजच्या बंदच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी पत्रकार परिषेद घेतली होती यावेळी त्यांनी वरिल वक्तव्यं केलं आहे.

सरकारच नावच, बंद सरकार आहे

दरम्यान प्रशासनाची मदत घेऊन, दमदाटी करून लोकांना बंद ठेवायला प्रवृत्त केलं जातं असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. या सरकारच तसंही नाव, बंद सरकार आहे ? कोरोनाकाळात देश उघडा असताना महाराष्ट्र बंद ठेवला गेला असल्याचा टोला त्यांनी यावेळी मारला. दमदाटी करून आणि प्रशासनाचा गैरवापर करून हा बंद केला जातोय इस्टर्न एक्सप्रेस वे वर १० कार्यकर्ते जमून रस्ता रोखून ठेवतात, आणि पोलीस बघ्याची भूमिका घेतात. पोलिसांचा पाठिंबा आहे का ? सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद माजवला जातोय असे सवाल देखील त्यांनी प्रशासनावर उपस्थित केले.

उच्च नाययालयाने नोंद घ्यायला हवी

ढोंगीपणा करायचं आणि मीडिया अटेंशन करायचं यासाठी हे सर्व सुरु आहे. जमिनीवरच दु:ख नाही मराठवाड्याच्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला हे जात नाहीत, पालकमंत्री , मुख्यमंत्री कोणी जात नाहीत मात्र बंद करण्याचा ढोंगीपणा यांना जमतो. मोदींच्या घोषणेचे पैसे थेट खात्यात जातात. मात्र यांच्या मदतीचा पत्ता नाही. तसेच बेस्टच्या बस फोडण्यात आल्या आहेत, त्यामुळे बस बंद केल्या, हे सगळं ठरवून केलं जात असून याची दखल उच्च न्यायालयाने High Court घ्यायला हवी अशी मागणी देखील फडणवीसांनी यावेळी केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : अब की बार कुणाचं सरकार? काही मिनिटांत मत मोजणीला सुरुवात

National Cashew Day: जागतिक काजू दिवसाचा इतिहास, महत्व आणि साजरा करण्याच्या पद्धती

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती ही पवारांची आहे- श्रीनिवास पवार

Maharashtra Election Result : राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, ३ आमदार न आल्यास आयोग मोठा निर्णय घेणार, निकष काय?

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

SCROLL FOR NEXT