Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : ससून रुग्णालयातून भाजप नेत्याचे सासरे गायब, २ महिन्यांपासून शोध सुरू; नेमकं काय घडलं?

Pune News : पुण्यातील ससून रुग्णालयातून भाजप पदाधिकाऱ्यांचे सासरे दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. रुग्णालयाकडून कोणतीही माहिती न दिल्याचा आरोप करण्यात आला असून हे प्रकरण आता वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांपर्यंत पोहोचले आहे.

Alisha Khedekar

  • ससून रुग्णालयात दाखल भाजप पदाधिकाऱ्यांचे सासरे दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत

  • भाजप पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयावर माहिती लपवण्याचा आरोप केला आहे

  • हे प्रकरण आता राज्याच्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांपर्यंत पोहोचत आहे

  • नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार रुग्णालय प्रशासन कोणतीही मदत किंवा माहिती देत नाही

  • घटनेमुळे ससून रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत

अक्षय बडवे, पुणे प्रतिनिधी

पुण्यातून धक्कदायक बातमी समोर आली आहे. एका भाजप पदाधिकाऱ्याचे सासरे रुग्णालयातून पळून गेल्याची घटना घडली. धक्कादायक म्हणजे रुग्णालयाकडून भाजप पदाधिकाऱ्याला कोणत्याही प्रकारची मदत होत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. याबाबत त्यांनी आता राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ तसेच राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे धाव घेणार असल्याचं सांगितलं आहे.

पुण्यातील भाजप पदाधिकारी पुष्कर तुळजापूरकर यांचे मामे सासरे ससून रुग्णालयात उपचारासाठी सप्टेंबर २०२४ दाखल झाले होते मात्र आता त्यांचा शोध घ्यायला गेलेल्या तुळजापूरकर यांना त्यांचे सासरे कुठे आहेत याबद्दल काहीच माहिती दिली जात नसल्याचं त्यांनी स्वतः सांगितलं आहे.

प्रकाश पुरोहित यांना सप्टेंबर २०२४ मध्ये ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते. रूग्णालयात दाखल केलेपासून आम्हाला कुठलीही माहिती पुरविली गेलेली नाही असा आरोप तुळजापूरकर यांनी केला आहे. ते मयत आहेत किंवा आपल्या रूग्णालयात अजूनही उपचार घेत आहेत या बाबत एक नातेवाईक म्हणून त्यांना कुठली ही माहिती दिली जात नाही, असा दावा त्यांनी केला आहे. याबाबत भाजप पदाधिकारी पुष्कर तुळजापूरकर आता राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ तसेच राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना याबाबत सांगणार असल्याचं सांगितलं आहे.

या संदर्भात तुळजापूरकर यांनी शासनाला पत्र सुद्धा लिहलं आहे. पत्रात तुळजापूरकर यांनी म्हटलं आहे की, "माझे मामे सासरे प्रकाश पुरोहित यांना दि. २३-९-२०२४ रोजी आपल्या रूग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते. सदर रूग्णाची आपल्या रूग्णालयात दाखल केल्यापासून आम्हाला कुठलीही माहिती पुरविली गेलेली नाही. सदर बाब आपल्या निदर्शनास आणून देणे मला अत्यंत महत्वाचे वाटले. ते मयत आहेत किंवा आपल्या रूग्णालयात अजूनही उपचार घेत आहेत याबाबत एक नातेवाईक म्हणून माझ्याकडे कुठलीही माहिती उपलब्ध होत नाही किंवा करून दिली जात नाही, ही अत्यंत खेदजनक बाब आहे."

तसेच ते पुढे म्हणाले,"मी स्वतः गेले दोन महिने पाठपुरावा करत असून माझा अक्षरशः फुटबॉल झाला आहे. या विभागातून त्या विभागात हेलपाटे मारून मी वैतागलो आहे. माझ्यासारख्या लोकप्रतिनीधीची जर ही गत असेल तर सामान्य जनतेच्या बाबतीत ससून किती गंभीर आहे हे दिसून येते. याबाबत मी सदर प्रकार हा श्री. हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य श्रीमती माधुरी मिसाळ, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री तथा संचालक वैद्यकीय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यादेखील निदर्शनास आणून देणार आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharmendra Health Update: ८९ वर्षीय धर्मेंद्र यांची प्रकृती कशी आहे? ८ दिवसांनी आली हेल्थ अपडेट

8th Pay Commission: १ कोटी कर्मचाऱ्यांना बसणार फटका; महागाई भत्ता, HRA आणि ट्रॅवल अलाउंस होणार बंद? नेमकं कारण काय?

Daily mistakes: तुमच्या दररोजच्या ५ चुका हार्ट अटॅक येण्यासाठी ठरतायत कारणीभूत; वेळीच व्हा सावध

Saif Ali Khan : बॉलिवूडच्या 'नवाब'चा थाटच न्यारा; मुंबईत खरेदी केली कोट्यवधींची प्रॉपर्टी, आकडा पाहून फिरतील डोळे

Maharashtra Live News Update: नवले ब्रीज पुन्हा उभारणार- मंत्री उदय सामंत

SCROLL FOR NEXT