Kalyan : काळू नदीचा जीव कोण घेतोय? कल्याणमध्ये दिवसाढवळ्या वाळू उपसा, तरी प्रशासन गप्प?

Kalyan News : कल्याण-आंबिवली परिसरातील काळू नदीत दिवसाढवळ्या सुरू असलेल्या बेकायदेशीर रेती उपशाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. रेती माफियांमुळे नदीकाठाला निर्माण झालेल्या पर्यावरणीय धोक्यामुळे नागरिक संतप्त आहेत.
Kalyan : काळू नदीचा जीव कोण घेतोय? कल्याणमध्ये दिवसाढवळ्या वाळू उपसा, तरी प्रशासन गप्प?
Kalyan NewsSaam Tv
Published On
Summary

काळू नदीतील बेकायदेशीर रेती उपसा दिवसाढवळ्या सुरू असल्याचा व्हिडिओ वायरल

प्रशासन आणि पोलीस निष्क्रिय असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी

रेती माफियांची दहशत वाढल्याने नदीकाठ पर्यावरणीय धोक्यात

पर्यावरण संघटनांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे

संघर्ष गांगुर्डे, कल्याण प्रतिनिधी

कल्याण आंबिवली परिसरातील काळू नदीत सुरू असलेल्या बेकायदेशीर रेती उपशाचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहे. दिवसा हा उपसा होत असल्याने सर्वांच्या भुवया उचलल्या आहेत.मोठ्या प्रमाणात रेती चोरट्यांकडून मशीनरीच्या मदतीने रेती उपसा सुरू असल्याचे दिसत असून परिसरातील नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रेती माफियांची दहशत वाढत असून दिवसाढवळ्या देखील रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांची रेलचेल सुरू आहे. यामुळे नदीकाठाचे पर्यावरणीय संतुलन धोक्यात येत असून काळू नदीच्या खोलीत व वहनक्षमतेत घट होत असल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Kalyan : काळू नदीचा जीव कोण घेतोय? कल्याणमध्ये दिवसाढवळ्या वाळू उपसा, तरी प्रशासन गप्प?
Eknath Shinde News : ठाणेकरांसाठी आनंदवार्ता! सरकारकडून मुद्रांक शुल्कात मोठी सवलत, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

सर्वात धक्कादायक म्हणजे हा व्हिडिओ वायरल झाल्यानंतरही स्थानिक प्रशासन, महसूल विभाग व पोलीस यांची कारवाई मात्र दिसत नसल्याने नागरिकांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे. अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोरच रेती माफिया उधळण करत आहेत, तरीही कारवाई नाही. हे नेमकं कुणाच्या आशीर्वादाने चालतंय? असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Kalyan : काळू नदीचा जीव कोण घेतोय? कल्याणमध्ये दिवसाढवळ्या वाळू उपसा, तरी प्रशासन गप्प?
Maharashtra Political News : शिंदेंचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारच दादांनी पळवला, भोरमध्ये महायुतीत संघर्ष टोकाला

दरम्यान, वाढत्या बेकायदेशीर रेती उपशामुळं नदीकाठच्या गावांना पूरपरिस्थितीचा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशाराही पर्यावरणप्रेमी संघटनांनी दिला आहे.नागरिकांनी संबंधित विभागांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन रेती माफियांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com