Eknath Shinde News : ठाणेकरांसाठी आनंदवार्ता! सरकारकडून मुद्रांक शुल्कात मोठी सवलत, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

Thane News : ठाणे महापालिका हद्दीतील JNNURM आणि BSUP योजनेंतर्गत सदनिकांसाठी करारनामा करताना केवळ १% मुद्रांक शुल्क आणि १०० रुपये प्रतिदस्त आकारण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. या निर्णयाचा थेट लाभ ६३४३ गरीब कुटुंबांना होणार आहे.
Eknath Shinde News : ठाणेकरांसाठी आनंदवार्ता! सरकारकडून मुद्रांक शुल्कात मोठी सवलत, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
Thane NewsSaam Tv
Published On
Summary

ठाण्यातील JNNURM आणि BSUP योजनांतील रहिवाशांना १% मुद्रांक शुल्काची सवलत जाहीर

प्रतिदस्त नोंदणीसाठी फक्त १०० रुपये आकारले जाणार

या निर्णयाचा लाभ ६३४३ गरीब कुटुंबांना थेट मिळणार

शहरी गरीबांच्या घरकुल खर्चात मोठी कपात करीत सरकारने दिला मोठा दिलासा

ठाणेकरांसाठी सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. ठाणे महापालिका हद्दीतील जे.एन.एन.यु. आर.एम. आणि बी.एस.यू.पी. योजनेअंतर्गत प्रकल्पबाधीतांना वैयक्तिक सदनिका करारनामा करताना एक टक्के मुद्रांक शुल्कात सवलत देतानाच त्यासाठी प्रतिदस्त १०० रुपये आकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल म्हणजे १८ नोव्हेंबर रोजी केली.

केंद्र शासन, राज्य शासन व ठाणे महानगरपालिकेचा संयुक्त उपक्रम असलेल्या जे.एन.एन.यु.आर.एम., बी.एस.यू.पी. योजना शहरी गरीबांकरिता आहेत. ठाणे महानगरपालिकेमार्फत या दोन्ही योजनेतंर्गत विकसित करण्यात आलेले भूखंड सध्याच्या झोपडपट्टयांच्या जागी असून तेथील नागरिकांचे पुर्नवसन बी.एस.यु.पी. सदनिकांमध्ये केले जाते.

Eknath Shinde News : ठाणेकरांसाठी आनंदवार्ता! सरकारकडून मुद्रांक शुल्कात मोठी सवलत, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
Shocking : महाराष्ट्र हादरला! अभ्यासासाठी मित्राच्या रूमवर गेली, मृतदेह आढळला, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीसोबत नेमकं काय घडलं?

हे रहिवासी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असून मजुरीची कामे करतात. त्यामुळे त्यांना सदनिका घेताना करारनामा दस्त नोंदणीचा मुद्रांक शुल्क अधिभार न सोसणारा आहे. तसेच यातील काही कुटुंबांना मिळणाऱ्या सदनिकांकरीता प्रत्येकी ५६ हजार ते १ लाख ३४ हजार इतका अधिभार भरावा लागणार होता.

Eknath Shinde News : ठाणेकरांसाठी आनंदवार्ता! सरकारकडून मुद्रांक शुल्कात मोठी सवलत, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
Shocking News : "तुला मिळवण्यासाठी मी स्मशानात..." जादूटोण्याच्या नावाखाली महिलेवर बलात्कार, नाशिकमधील धक्कादायक घटना

ही बाब विचारात घेऊन या योजनेंतर्गतच्या शहरी गरीबांकरिता एक टक्के मुद्रांक शुल्क अधिभारात सवलत देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथशिंदे यांनी घेतला. या निर्णयाचा लाभ ठाणे विभागातील ६३४३ गरीब कुटूंबांना होणार आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com