BMC Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News : मुंबईकरांनो काळजी घ्या! हिवताप आणि डेंग्यूसह चिकुनगुनियाची साथ, आकडेवारी चिंता वाढवणारी

Mumbai Health News : अंधेरी पश्चिम परिसरात या साथीचं प्रमाण जास्त आहे. तिन्ही साथीच्या आजारांसाठी हा परिसर ‘हॉटस्पॉट’ ठरत आहे.

सूरज सावंत

Mumbai News :

मुंबईत हिवताप, डेग्यू आणि चिकुनगुनियाच्य वाढत्या रुग्णांची संख्या चिंता वाढवणारी आहे. हिवताप आणि डेंग्यूसह चिकुनगुनियाची साथ प्रशासनासमोर नवं आव्हान आहे. कारण जानेवारीपासून आतापर्यंत मुंबईत हिवतापाचे जवळपास ५ हजार रुग्ण आढळले आहे. तर डेग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पश्चिम परिसरात या साथीचं प्रमाण जास्त आहे. तिन्ही साथीच्या आजारांसाठी हा परिसर ‘हॉटस्पॉट’ ठरत आहे. वर्षभरामध्ये अंधेरी पश्चिम या प्रभागामध्ये हिवतापाचे २३४, डेंग्यूचे ५४२, चिकुनगुनियाचे ३८ रुग्ण सापडले आहेत. तर, अंधेरी पूर्व प्रभागामध्ये डेंग्यूचे २५३ आणि चिकुनगुनियाचे ५६ रुग्ण आढळले आहेत. (Latest Marathi News)

मुंबईमध्ये जानेवारीपासून आतापर्यंत हिवतापाचे ४९६० इतके रुग्ण सापडले आहेत. यामध्ये प्रभादेवीमध्ये ५२७, भायखळा ४०३, दादर २५६, परळ २३२, मुलुंड १९२ आणि माटुंगामध्ये १८३ रुग्ण सापडले आहेत.

डेंग्यूचे ३७५३ इतके रुग्ण सापडले असून, खार ३२७, बोरिवली ३२१, अंधेरी पूर्व २५३, कांदिवली २४८, भांडुप १९१ इतके रुग्ण सापडले आहेत. साथनियंत्रणासाठी यूनिसेफ, डब्ल्यूएचओ, सीएचआरआय या संस्थांची मदत घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाने मुंबई महानगरपालिकेला केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Diet: तुमच्या रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असणे महत्वाचे आहे? जाणून घ्या फायदे

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

Nanded News : लोहामध्ये मतमोजणी केंद्राबाहेर दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त वाढविला

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: लाडक्या बहिणीमुळे आमचा विजय - अजित पवार

Maharashtra Election Result: महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

SCROLL FOR NEXT