CM Devendra Fadnavis On Delimitation Bill Saam Tv
मुंबई/पुणे

Delimitation Bill: यांचा विरोध डिलिमिटेशनला नाही तर महिला आरक्षणाला, मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना प्रत्युत्तर

CM Devendra Fadnavis On Delimitation Bill: डिलिमिटेशनला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिलं. ‘त्यावेळेस झोपले होते का?’, असा सवाल त्यांनी केला.

Priya More

डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकावरून सध्या राज्यासह देशातील राजकारण तापले आहे. या विधेयकाला इंडिया आघाडीतील अनेक पक्षांनी विरोध केला आहे. यावरून आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. विरोधक दुटप्पी भूमिका घेत असल्याचे म्हणत त्यांनी 'डिलिमिटेशन विधेयकाला विरोध करणारे लबाडी करत आहेत.', अशी टीका त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, 'डिलिमिशेशमुळे लोकसभेच्या जागा महिलांसाठी आरक्षित होतील. विरोधकांना आता लबाडी सोडली पाहिजे. डिलिमिटेशन होणार हे २०२३ मध्येच विरोधकांना माहिती होते. जेव्हा २०२३ मध्ये महिला आरक्षण विधेयक आणण्यात आलं होतं. तेव्हाच स्पष्ट करण्यात आले होते की हे आरक्षण लागू करण्यासाठी डिलिमिटेशन विधेयक आणावे लागेल. तेव्हा सगळ्यांनr डिलिमिटेशन लागू होणार याला मान्यता दिली. एकमताने त्यांनी हे मान्य केले. तेव्हा विरोध का नाही केला.त्यावेळी विरोधक झोपले होते का? तेव्हा विरोध का केला नाही? महिला आरक्षण बिल लागू करण्यासाठी डिलिमिटेशन गरजेचे आहे. महिला आरक्षणामध्ये डिलिमिटेशनचा उल्लेख होता. २०२९ पर्यंत ३३ टक्के जागा महिलांसाठी आरक्षित असतील.'

संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील वरिष्ठ मंत्र्यांची आज दिल्लीत महत्वाची बैठक पार पडली. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीमध्ये अधिवेशनाबाबत रणनीती ठरवण्यात आली. सोमवारी संसदेच्या अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. या अधिवेशनापूर्वीच राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इंडिया आघाडीचे नेते एम के स्टॅलिन आणि शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. मल्लिकार्जुन खरगे दुपारी २ वाजता स्टालिन यांना आणि रात ८ वाजता ते पवारांची भेट घेणार आहेत. डिलिमिटेशन बिलाबाबत पवारांना भेटून सर्व नेते चर्चा करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सोनिया गांधी, राहुल गांधी, ममता बॅनर्जी हे सुद्धा खरगे यांच्यासोबत पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे. डिलिमिटेशन विधेयक संसदेत सादर होण्यापूर्वीची ही भेट महत्वाची मानली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breaking News : राजकारणात खळबळ! बड्या नेत्याने सोडली आम आदमी पक्षाची साथ

Vande Bharat Express : वंदे भारत ट्रेनच्या जेवणात चक्क लोखंडी बोल्ट! प्रवाशाच्या तक्रारीनंतर IRCTC ची मोठी कारवाई

Kitchen Vastu Tips: किचनमध्ये कचरा किती वेळ ठेवला पाहिजे? तो कधी बाहेर टाकावा? वास्तुशास्त्रात सांगितलेत खास नियम

टॉयलेट स्वच्छ कसा करायचा?

Maharashtra News Live Update: महिला आरक्षणावर निलम गोऱ्हेंचा काँग्रेसवर निशाणा; ‘पक्षात ५० टक्के आरक्षण का दिलं नाही?’

SCROLL FOR NEXT