Dehu
Dehu Saam Tv
मुंबई/पुणे

Dehu Devasthan Election : देहू संस्थानच्या अध्यक्षपदासाठी उद्या मतदान, निवडणुकीच्या रिंगणात दाेन माेरे

दिलीप कांबळे

Dehu : जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या देहू देवस्थान संस्थेच्या अध्यक्षपदाची निवडणुक (dehu devasthan election) उद्या (रविवार) हाेणार आहे. या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांचा कार्यकाळ संपल्याने देहू संस्थानच्या अध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर झाली आहे. (Maharashtra News)

यंदाची निवडणूक दाेन माेरे यांच्यात हाेणार आहे. या संस्थेच्या अध्यक्ष पदासाठी पुरुषोत्तम महाराज मोरे आणि उमेश महाराज मोरे यांच्यात ही थेट लढत हाेणार असल्याचं चित्र आहे. देहू संस्थांनचं अध्यक्ष पद कोणाला मिळतं याकडे देहूकरांचे लक्ष लागलं आहे.

उद्या (२६ मार्च) अध्यक्ष पदासाठी मतदान होणार आहे. तसेच सायंकाळी नवनिर्वाचित अध्यक्ष कोण याचा निकाल लागणार आहे. यंदा अध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे बघावं लागणार आहे. देहू संस्थानवर संत तुकाराम महाराजांचे वंशज मोरे कुटुंबियांपैकी एकाची अध्यक्ष पदासाठी वर्णी लागते. ही निवड दोन वर्षाकरीता असते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीची देहूकरांना उत्सुकता लागून राहिली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : आम्ही कायम भांडत रहावं आणि...; आदित्य ठाकरेंच्या आरोंपांवर दीपक केसरकरांचा पलटवार

Today's Marathi News Live : उजनी धरणातून 10 मे रोजी सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार

Health Tips: सकाळी आंघोळीच्या पाण्यात 'ही' एक गोष्ट मिसळा; आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक; नागपुरातील निवास्थानाबाहेर निदर्शने

Mumbai News: नोकरीसाठी मराठी माणूस नको,पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कंपनीने मागितली माफी; काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT