eknath shinde  ani twitter
मुंबई/पुणे

बीकेसीतील दसरा मेळाव्यामुळे शिंदे गट अडचणीत येण्याची शक्यता; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

शिंदे गटाच्या बीकेसी मैदानातील दसरा मेळाव्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

रश्मी पुराणिक

Shinde camps Dasara melava : शिंदे गटाने बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडली आहे. शिंदे गटच खरी शिवसेना असल्याचा दावा त्यांच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. यामुळे दसरा मेळाव्याला शिवसेनेच्या पंरपरेनुसार शिंदे गटाने बीकेसी मैदानात दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे. मात्र, याच दसरा मेळाव्यावरून शिंदे गट अडचणीत येण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या बीकेसी मैदानातील दसरा (Dasara) मेळाव्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या ठाकरे गटाने शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याचे आयोजन केले. तर शिंदे गटाने मुंबईच्या बीकेसी मैदानात दसरा मेळाव्याचे आयोजन केले. शिंदे गटाने बीकेसी मैदानावर भव्यदिव्य दसरा मेळाव्याचे आयोजन केले. या मेळाव्याला राज्यभरातून शिंदे गटाचे समर्थकांनी हजेरी लावली. मात्र, शिंदे गटाच्या बीकेसीतील दसरा मेळव्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दिपक जागदेव यांनी वकील नितीन सातपुते यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

शिंदे गटाने ग्रामीण भागातून लोकांना मुंबईत आणण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या हजारो बसेस बुक केल्यानं ग्रामीण भागातील लोकांना, विद्यार्थ्यांना त्रास झाल्याची याचिकेत तक्रार नोंद करण्यात आली आहे.

तसेच १० कोटी रुपये एसटी महामंडळाला कसे आणि कोणी दिले? याचाही तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी आर्थिक गैरव्यवहार आणि आयकर कायदा कलम ६८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचीही याचिकेत मागणी केली आहे. दिपक जगदेव यांनी वकील नितीन सातपुते यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेवर लवकरच सुनावणी अपेक्षित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT