पुणे नवरात्र महोत्सवात लक्ष्मी मातेला पंचवीस किलो चांदीची साडी अर्पण अश्विनी जाधव-केदारी
मुंबई/पुणे

पुणे नवरात्र महोत्सवात लक्ष्मी मातेला पंचवीस किलो चांदीची साडी अर्पण

कला-संस्कृती, गायन-वादन यांचा मनोहारी संगम असणारा पुणे नवरात्र महोत्सवास आज गुरुवार दिनांक ७ ऑक्टोबर पासून प्रारंभ झाला.

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे: कला-संस्कृती, गायन-वादन यांचा मनोहारी संगम असणारा पुणे नवरात्र महोत्सवास आज गुरुवार दिनांक ७ ऑक्टोबर पासून प्रारंभ झाला. आजच्या घटस्थापनेच्या दिवशी पुणे नवरात्र महोत्सवाचे संस्थापक आयोजक व पुणे मनपा काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल व महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांच्या वतीने लक्ष्मी मातेस २५ किलो चांदीची साडी अर्पण करण्यात आली. (Dedication of 25 kg silver sari to Mata Lakshmi at Pune Navratra Festival)

हे देखील पहा -

यावेळी पुणे नवरात्र महोत्सवाचे सदस्य रमेश भंडारी, घनश्याम सावंत, नंदकुमार कोंडाळकर आणि कोषाध्यक्ष नंदकुमार बानगुडे आदी मान्यवर उपस्थित होते. महोत्सवाचे यंदाचे २७ वे वर्ष आहे. पुणे नवरात्रो महोत्सवाअंतर्गत प्रतिवर्षी होत असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांवर कोरोना परिस्थितीमुळे मर्यादा येत असल्या तरी प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या श्री लक्ष्मी माता जीवन गौरव पुरस्काराचे उद्या घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच ८ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पत्रकार भवनच्या कमिन्स सभागृहात लक्ष्मी माता जीवन गौरव पुरस्कार प्रदान कार्यक्रम होईल.

यंदा बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित डॉ. रेवा नातू आणि निर्मला गोगटे, ज्येष्ठ संपादक यमाजी मालकर वेदमूर्ती श्रीकांत दंडवते गुरुजी आणि लावणी लोककलावंत पूनम कुडाळकर यांना श्री लक्ष्मी माता जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाईल. देवीची प्रतिमा, सन्मानचिन्ह, पुस्तक, शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असणार आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनमाड-इंदोर रेल्वे जमीन अधिग्रहण प्रकरणी बाधितांची रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक निष्फळ

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT