मिशन कवच कुंडल: दसऱ्यापर्यंत रोज १५ लाख लोकांचं लसीकरण करणार - राजेश टोपे

देशामध्ये १५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशीपर्यंत १०० कोटी लसीकरण व्हावं, असा केंद्र सरकारचा टार्गेट आहे. त्यानुसार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही घोषणा केली आहे.
मिशन कवच कुंडल: दसऱ्यापर्यंत रोज १५ लाख लोकांचं लसीकरण करणार - राजेश टोपे
मिशन कवच कुंडल: दसऱ्यापर्यंत रोज १५ लाख लोकांचं लसीकरण करणार - राजेश टोपेSaam Tv News

मुंबई: देशामध्ये १५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशीपर्यंत १०० कोटी लसीकरण व्हावं, असा केंद्र सरकारचा टार्गेट आहे. यानुसार महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात लसीकरण होत आहे. मिशन कवच कुंडल या मोहिमेनुसार ८ ते १५ ऑक्टोबर पर्यंत दररोज किमान १५ लाख लसीकरण टार्गेट राज्य सरकारचे आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. (Mission Kavach Kundal: 15 lakh people will be vaccinated daily till Dussehra - Rajesh Tope)

हे देखील पहा -

पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, आजच्या घडीला महाराष्ट्रात १ कोटी लसीचे डोस उपलब्ध आहे. हा सगळा स्टॉक ६ दिवसांनमध्ये संपवावा असं राज्य सरकारचं उद्धीष्ट आहे. आपल्या राज्याला ९ कोटी १५ लाख इतकं उद्धिष्ट आहे. यापैकी ६ कोटी लोकांचा पहिला डोस झाला आहे. अजून ३ कोटी २० लाख उद्धिष्ट आहे, ते झालं तर मोठं संरक्षण मिळेल. दुसरा डोस अडीच कोटी लोकांनी घेतला आहे. ६५% लोकांनी पहिला डोस तर ३०% लोकांनी दुसरा डोस घेतला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

पुढे ते म्हणाले की, आता फर्स्ट डोसला अधिक प्राधान्य द्यायचं आहे. आज ६५% लसीकरण झालं आहे, म्हणून सगळं काही ओपन झालं आहे, काहीही राहिलेलं नाही. जरी कुणी आजारी झालं तरी त्याची दाहकता कमी होईल. ऑक्सिजनची, आयसीयूची गरज पडणार नाही त्यामुळे डेथ रेट आटोक्यात राहिल, हाच आपला उद्देश आहे. लसीकरणाचं महत्व सगळ्यांनी जपावं. लसीकरणाबाबत सगळ्यांनी प्रबोधन करण्याची गरज आहे. सामाजाच्या काही घटकांची विशेष काळजी घेतली पाहिजे. सामाजिक आणि धार्मिक गुरु, मौलवी यांसारख्या धर्मगुरुंना यात सहभागी करुन घेत लसीकरण करण्याची गरज आहे.

मिशन कवच कुंडल: दसऱ्यापर्यंत रोज १५ लाख लोकांचं लसीकरण करणार - राजेश टोपे
मंदिरं उघडली! पालकमंत्री अदिती तटकरे यांनी घेतले पाली बल्लाळेश्वरचे दर्शन

काल राज्याच्या संपुर्ण आरोग्य विभाग आणि अधिकारी यांची ऑनलाईन बैठक घेतली, आपल्याला मायक्रो लेव्हलवर काम करण्याची गरज आहे. त्या सगळ्यांना आवश्यक त्या सुविधा, साधन-सामुग्री उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आता लोकांना लसीकरण केंद्रापर्यंत आणण्याची गरज आहे. आता आपण आपलाच उच्चांक गाठण्याची गरज आहे. एका दिवसांत २०-२५ लाख लसीकरण करु शकतो. मिशन कवच कुंडल म्हणजे आपण सुरक्षेच्या मिशनवर आहोत. शासनाच्या व्यतिरिक्त आपणा आयएमए, खाजगी डॉक्टर, रोटरी क्लब, लायन्स क्लब, एनजीओ या सगळ्यांची मदत आपण घेऊ शकतो. केंद्र सरकारच्या योजनासुद्धा राबण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com