नवीन वर्षातला पहिला सण संक्रातीचे सगळ्यांना वेध लागलेत. संक्रात म्हणजे पतंगोत्सव आलाच. आत्तापासून पतंगांची गर्दी आकाशात दिसून येतेय. मात्र त्यासाठी असणारा मांजा नागरिकांसाठी जीवघेणा ठरतोय. पुण्यात बोपखेल–खडकी पुलावरुन जाणारी महिला जखमी झाली आहे. दुचाकीवरुन जाताना चायनीज मांजा महिलेच्या मानेवर घासला गेल्याने गंभीर दुखापत झाली. नागरिकांनी धाव घेत महिलेला मदत केली. मात्र अशा घटना पुण्यासह इतर शहरातही वारंवार घडतायेत. नाशिक शहरातील सातपूरमध्ये सुषमा यादव या महिलेच्या पायाला नायलॉन मांजामुळे मोठी जखम झाली.
तर मनमाडमध्ये काही दिवसांपूर्वी डॉ.विद्या मगर दुचाकीवरुन क्लिनिकमध्ये जात असताना मांजामुळे जखमी झाल्या होत्या. त्यांना 25 टाके पडले होते. बंदी असूनही दरवर्षी नायलॉन मांजाची शहरात विक्री होतेच कशी ? हाच खरा प्रश्न आहे. नायलॉन मांजामुळे दरवर्षी शेकडी पक्षीही जखमी होतात.
दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर शहरातही नायलॉन मांजामुळे अनेक नागरिक जखमी झालेत. त्यामुळे पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. नायलॉन मांजा वापरणारे आणि त्याची विक्री करणाऱ्यांवर ड्रोनद्वारे नजर ठेवण्याचा मोठा निर्णय पोलिसांनी घेतलाय. मुलांनी नायलॉन मांजा वापरला तर पालकांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिलाय.
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने या मांजावर बंदी घातली असली तरी, त्याचा वापर थांबलेला नाही. नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगरात विक्रेत्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. शहरापासून ते अगदी गावाच्या बाजारपेठेतून हा जीवघेणा नॉयलॉन मांजा कधी हद्दपार होणार हाच खरा प्रश्न आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.