भूषण शिंदे
Mumbai News : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त देवेंद्र फडणवीस यांनी आज बिकेसी येथील मैदानाची पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) यांनी मुंबई महापालिकेकडून ४०० किलोमीटरच्या रस्त्यांमध्ये ६ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ज्यांचे संपूर्ण आयुष्य घोटाळे करण्यात गेलं त्यांना सीमेंटचे रस्ते होत असल्याचं पाहून दु:ख होत आहे. कारण सीमेंटचे रस्ते झाले की ४० वर्षे रस्ते बनवण्याचं काम पडणार नाही. आतापर्यंत दरवर्षी डांबरी रस्ते करायचे आणि भ्रष्टाचार करायचा हेच काम सुरु होत. २०१८ साली जेव्हा चौकशी झाली तेव्हा २०० रस्त्यांमध्ये खालचा लेयरच नव्हता. अशा प्रकारची कामं त्यांनी २५ वर्ष केली. आपली दुकानदारी बंद होतेय म्हणून त्यांची ओरड सुरू आहे,असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिलं.
आमच्याच विकास कामांचं लोकार्पण पंतप्रधान करणार आहेत, अशी टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली होती. राऊत यांच्या या टीकेचाही फडणवीसांचा खरपूस समाचार घेतला आहे. हे झोपेत बोलणारी लोकं आहेत. मेट्रोचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होत, उद्घाटनही तेच करता आहेत. एसटीपीच्या संदर्भात मी स्वत: मुख्यमंत्री असताना केंद्र सरकारकडून परवानगी आणली होती. मात्र, टक्केवारी ठरली नाही म्हणून या लोकांनी वर्क ऑर्डर काढली नाही. पुन्हा आमचे सरकार आल्यावर आम्ही तात्काळ वर्क ऑर्डर काढलं. त्यामुळे ही कामं आमच्या काळात झाली हे म्हणायचा विरोधकांना अधिकार नाही”, असेही फडणवीस म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.