सचिन गाड, मुंबई|ता. २१ जुलै २०२४
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध कायद्यांतर्गत म्हणजेच UAPA दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. मात्र तरी त्याच्याशी किंवा त्याच्या टोळीशी संबंधित व्यक्तीवर युएपीएअंतर्गत कारवाई केली जाऊ शकत नाही, असे महत्वाचे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ऑगस्ट २०२२ मध्ये फैज भिवंडीवाला याच्याकडून ६०० ग्रॅम गांजा जप्त केला होता. तर त्याचा साथीदार परवेज वैद हा दाऊद टोळीचा कथित सदस्य असल्याच्या संशयावरून UAPA अंतर्गत त्यालाही अटक करण्यात आली होती. या अटकेविरोधात दोघांनीही उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या सुनावणीवेळी दोघांना जमीन मंजूर करताना न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवले आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध कायद्यांतर्गत म्हणजेच UAPA अंतर्गत दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. मात्र त्याच्याशी किंवा त्याच्या टोळीशी संबंध आहेत म्हणून युएपीएअंतर्गत कारवाई केली जाऊ शकत नाही, असे कोर्टाने म्हटले आहे.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या दोघांवरही युएपीएतंर्गत दहशतवादी संघटनेचे सदस्य असणे, दहशतवादी कृत्ये करणे आणि गुन्हा करण्यासाठी पैसे गोळा करणे, तसेच अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यातील (एनडीपीएस) तरतुदीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.