मयूर राणे, साम टीव्ही मुंबई
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना जोगेश्वरी भूखंड प्रकरणी मोठा दिलासा मिळालाय. कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणामध्ये रविंद्र वायकर यांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता. परंतु आता याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून तपास बंद करण्याचा क्लोजर रिपार्ट म्हणजे सी समरी रिपोर्ट न्यायालयात सादर केला गेलाय. यावरून मात्र ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आक्रमक झाल्याचं दिसत आहे. त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पक्षांतर झाल्यानंतर खटले कसे मागे घेतले जातात, असा सवाल राऊतांनी विचारला आहे.
संजय राऊत नेमकं काय बोलले?
आता फक्त दाऊद इब्राहिमलाच क्लीनचीट द्यायचं बाकी आहे. हे सरकार ओवाळून टाकलेले सगळे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेत ( Ravindra Waikar Clean Chit) आहेत. आमची ताकद किती, हे दंडाची बेडकी फुगून दाखवत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. या सगळ्या लोकांवरती भ्रष्टाचारासंदर्भात कारवाई करा. ईडी, सीबीआयचे खटले दाखल केले. यामध्ये वायकरसुद्धा आहेत, वायकर हे घाबरून पळून गेले असल्याचा टोला यावेळी माध्यमांशी संवाद साधताना राऊतांनी लगावला आहे.
हे काय कायद्याचं राज्य आहे का?
वायकरांना आता क्लीनचीट (maharashtra politics) दिली. या सरकारमध्ये दुसरं काय होऊ शकतं? हे काय कायद्याचं राज्य आहे का? असा संतप्त सवाल देखील राऊतांनी उपस्थित केला आहे. याचा अर्थ असा, तुम्ही आमच्या लोकांवरती खोटे खटले, खोटे गुन्हे दाखल केले. त्यांच्या मनात भीती निर्माण करून त्यांना आपल्या पक्षात घेतलं, हे तुम्ही मान्य करत असल्याची टीका राऊतांनी विरोधकांवर (bjp) केली आहे.
दबाव आणण्याचा विरोधकांचा प्रयत्न
आमच्यासह सर्वांवरती तुम्ही खोटे खटले खोटे गुन्हे दाखल केले. आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. आमच्यासारखे काही लोक दबावाला बळी पडले नाहीत, पण ज्यांचं काळीज उंदराचं आहे, तसे अनेक लोक पळून (sanjay raut) गेले. त्यातीलच एक वायकर असल्याचं राऊतांनी म्हटलंय. आमच्यावरील तसंच नवाब मलिक यांच्यावरील सुद्धा गुन्हे मागे घ्या. प्रफुल पटेल यांच्यावरील 150 कोटींची प्रॉपर्टी तुम्ही रिलीज केलीत. तुमच्या पक्षात येत नाही म्हणून आमच्या सुद्धा मध्यम वर्गीयांच्या प्रॉपर्टी तुम्ही जप्त केल्या असल्याचा खोचक टोला संजय राऊत यांनी यावेळी विरोधकांना लगावला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.