Datta Bharane Video : Saam tv
मुंबई/पुणे

Datta Bharane Video : ६ वाजल्यानंतर तुम्हाला मायबाप कोण? इंदापुरात दत्ता भरणे यांची मतदारांना दमदाटी; व्हिडिओ व्हायरल

Datta bharane viral Video : ६ वाजल्यानंतर तुम्हाला मायबाप कोण? असे शब्द वापरत दत्ता भरणे हे मतदारांना दमदाटी करताना दिसत आहे. रोहित पवारांनी हा व्हिडिओ 'एक्स' प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे.

Vishal Gangurde

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान सुरु आहे. राज्यातील बारामती लोकसभेच्या लढाईकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. आज सकाळपासून लोक मतदानासाठी बाहेर पडले आहेत. या मतदानादरम्यान इंदापुरातील दत्ता भरणे यांचा मतदारांना दमदाटी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ६ वाजल्यानंतर तुम्हाला मायबाप कोण? असे शब्द वापरत दत्ता भरणे हे मतदारांना दमदाटी करताना दिसत आहे. रोहित पवारांनी हा व्हिडिओ 'एक्स' प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात सर्वत्र मतदानाची धावपळ पाहायला मिळत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वच मतदान केंद्रावर मतदारांची झुंबड पाहायला मिळत आहे. मतदार रांग लावून मतदान करत आहेत. आज या लोकसभा मतदारसंघात शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी देखील मतदान केलं आहे. याचदरम्यान, आमदार दत्ता भरणे यांचा मतदारांना दमदाटी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओचा आधार घेत आमदार रोहित पवारांनी गंभीर आरोप केला आहे.

रोहित पवारांनी काय आरोप केला?

रोहित पवार यांनी 'एक्स' वर पोस्ट करत आरोप केले आहेत. 'केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडिओत बघा…विशेष म्हणजे ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा बलुतेदारांपैकी एक आहेत…ही चिडचिड खूप काही सांगून जाते. पण आजच्या लढाईत स्वाभिमानी कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दपडशाहीला भीक घालणार नाही, असा आरोप रोहित पवारांनी केला आहे.

दरम्यान, दत्ता भरणे यांचा सोशल मीडियावरील व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली आहे. दत्ता भरणे यांचा हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, याबद्दलची माहिती कळू शकलेली नाही. मात्र, हे दृश्य मतदान केंद्राबाहेरील दिसत आहे.

दरम्यान, रोहित पवारांनी शेअर केलेल्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी त्यावेळी दोन कार्यकर्त्यांचे वाद सोडवत होते, असे स्पष्टीकरण दत्ता भरणे यांनी दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

SCROLL FOR NEXT