Eknath shinde and uddhav thackeray  Saam TV
मुंबई/पुणे

Dasara Melava 2022 : दसरा मेळाव्यासाठी कोणालाच परवानगी नाही?

शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याबाबत पालिका सावध भूमिका घेण्याच्या पवित्र्यात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेत (Shivsena) पडलेल्या फुटीमुळे राज्यात सत्तांतर झालं आणि ठाकरे आणि शिंदे गट अशी शिवसेनेची विभागणी झाली. शिंदे गटाने शिवसेना पक्षासह चिन्हावर देखील आपलाच अधिकार असल्याचा दावा केला आहे. शिवाय आता शिंदे गटाकडून प्रति शिवसेना भवन (Shivsena Bhavan) देखील उभारणारणाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

दरम्यान, शिवसेनेची ओळख असणारा शिवाजी पार्कवर होणारा पारंपरिक दसरा मेळावा (Dasara Melava) कोणाचा आणि कुठे होणार? याबाबद सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे, यासाठी शिवसेना आणि बंडखोर आमदारांच्या गटानेही दावा केला आहे. असला तरी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याबाबत पालिका सावध भूमिका घेण्याच्या पवित्र्यात आहे.

हे देखील पाहा -

मेळाव्यासाठी शिंदे-ठाकरे या दोन्ही गटाकडूनही अर्ज आल्याने परिस्थिती चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील सद्यस्थिती पाहता दोन्ही गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका कोणत्याही गटाला परवानगी देण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

शिवाजी पार्क मैदानाची परवानगी देण्याबाबत पालिकेचा विधी विभागाने आद्यपही निर्णय दिलेला नाही. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दसरा मेळावा शिवसेनेसाठी इतका महत्त्वाचा का?

महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा आणि वाटचाल ठरवण्यात शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा निश्चितपणे उल्लेख करता येईल. दरवर्षी दसरा मेळाव्यात स्व बाळासाहेब ठाकरे यांचे झंझावती भाषण असायचे. बाळासाहेब ठाकरे यांची प्रत्येक सभा ही विरोधकांची पिसं काढणारी आणि आक्रमक असायची. मात्र, बाळासाहेबांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचे स्थान हे काही वेगळेच असायचे.

त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी रावण दहनानंतर बाळासाहेब ठाकरे यांना ऐकण्यासाठी शिवाजी पार्कचे मैदान गर्दीने तुडूंब भरलेले असायचे. यावेळी शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द ना शब्द कानात साठवून ठेवायचे. दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी दिलेला आदेश हा शिवसैनिकांसाठी कायमच प्रमाण होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रुपाली चाकणकर यांनी बटेंगे तो कटेंगे वादावरून भाजपला घराचा आहेर

Viral Video: वाह! काटा लगा गाण्यावर लोकलमध्ये प्रवाशांची जुगलबंदी, आजोबांनाही केला हटके डान्स; पाहा व्हिडिओ

Maharashtra Election : संभाजीनगरमध्ये सोन्याची गाडी सापडली, १९ कोटींचं घबाड जप्त!

Gajkesari Yog: गुरु चंद्राच्या युतीने बनला गजकेसरी राजयोग; 'या' राशींना मिळणार डबल इनकम; आयुष्यात होणार धनवृष्टी

Shahrukh Khan Real Name: किंग खानचे खरं नाव शाहरुख नाही तर 'हे' आहे; तुम्हाला माहितीये का?

SCROLL FOR NEXT