Dadar Suitcase Case Saam Digital
मुंबई/पुणे

Dadar Suitcase Case : दादर सूटकेस प्रकरणाचं आंतरराष्ट्रीय 'मूकबधीर' कनेक्शन; पोलीस हवालदाराच्या मुलाने कसं उलगडलं खूनाच गूढ? पाहा VIDEO

Sandeep Gawade

एखाद्या सस्पेन्स चित्रपटाच्या कथानकापेक्षाही भयानक दादर मर्डर प्रकरणात दररोज नवीन खुलासे होतं आहेत. दादरमध्ये सुटकेसमध्ये सापडलेला मृतदेह अर्शद अली शेखचा (३० वर्षे) असून पोलिसांनी त्याचे मारेकरी जय प्रवीण चावडा आणि शिवजीत सुरेंद्र सिंग दोघांनाही ताब्यात घेतलं आहे. मात्र खूनाचं गूढं कसं उलगडाचं याचं पोलिसांसमोर आव्हान होतं, कारण अर्शदचा खून करणारे आरोपी ना बोलू शकता ना ऐकू शकतात, दोघंही मूकबधीर.. मात्र एक पोलीस हवालदाराचा मूकबधीर मुलगा पोलिसांच्या मदतीला धावून आला आणि प्रकणात एकमागून एक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली. प्रकरणात सामील असणाऱ्या व्यक्ती आणि त्याचं कनेक्शन ऐकून पोलीसही चक्रावून गेले आहेत.

हत्येचं गूढ इथेच संपत नाही, पोलीस हवालदार राजेश सातपुते यांचा मुलगा गौरवने आणखी एक धक्कादायक माहिती दिली आहे. दोन्ही आरोपी एका अशा व्हॉट्सॲप ग्रुपचे सदस्य आहेत. ज्यामध्ये जगातील अनेक देशांमधील अपंग व्यक्ती आहेत. हर्षदचा खून करण्यासाठी मारेकऱ्यांनी या ग्रुपमधील तीन अपंगांची मदत घेतली होती. हत्या करताना त्या तीन अपंगांशी व्हिडिओ कॉलवर संभाषण करण्यात आलं होतं. त्यात बेल्जियममधील एका अपंगाचाही समावेश आहे.

या प्रकरणात आर.ए. किडवई मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राजेश सातपुते याचा मुलगा गौरव हिरो ठरला आहे. त्याने दादर रेल्वे स्थानकावर रात्री २ वाजता घडलेल्या एका मोठ्या खुनाच्या प्रकरणाची उकल करण्यासाठी त्यांने वडिलांना आणि मुंबई पोलिसांना मदत केली आहे. गौरवला जरी त्याला बोलता किंवा ऐकता येत नसलं तरी त्याने माहिती देताना सांकेतिक भाषा वापरली, त्यातून खूनाचा उलगडा झाला. पोलीस कर्तव्य पार पाडत असताना न डगमगता या खूनात मुलाच्या मदतीने पोलिसांची मदत केल्यामुळे मुंबई पोलिसांनी सातपुते यांचं कौतुक होत आहे.

रेल्वे पोलिसाची सतर्कता

गेल्या रविवारी दादर रेल्वे स्थानकावर हे दोन आरोपी सुटकेसमध्ये कोणतीतरी अवजड वस्तू भरून चालले होते. त्यांना ती सुटकेस उचलता येत नव्हती, यावेचदरम्यान आरपीएफची नजर त्यांच्यावर पडली. त्याला संशय आला आणि त्यांचा पाठलाग केला. आरपीएफ आपल्याकडे येतोय असं लक्षात येतातच, त्या गोघांनी तेथून पळ काढला. त्यांनंतर तपास करण्यासाठी रेल्वे पोलिसांनी बॅग उघडली आणि त्यांना धक्काच बसला. सूटकेसमध्ये प्लास्टिकमध्ये गुंडाळलेला आणि रक्ताने माखलेला मृतदेह होता. पोलिसांना लागलीच त्या दोघांचा शोध घेण्यासाठी पथकं पाठवली काही तासात त्यांना उल्हानगर परिसरातून ताब्यात घेण्यात आलं.

चार सांकेतिक भाषा तज्ज्ञांचीही मदत

पोलिसांनी आरोपींची चौकशी केली असता दोघंही मुकबधीर निघाले. त्यांचे हावभाव पोलिसांना समजू शकले नाहीत. यासाठी मुंबई पोलिसांनी हवालदार राजेश सातपुते यांच्या मुलाने मदत केली. त्यांचा मुलगाही मूकबधीर आहे. हवालदाराच्या मुलाने आरोपींशी हातवारे करून बोलण्यास सुरुवात केली. त्यांच्यात सांकेतिक भाषेत संभाषण झाले. मृत अर्शद शेख हा देखील मूकबधीर असून तिघेही मित्र असल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रकरण सोडवण्यासाठी चार सांकेतिक भाषा तज्ज्ञांचीही मदत घेण्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

अनैतिक संबंधातून खून

गुलाल वाडी परिसरात राहणाऱ्या अर्शद शेखची आरोपींनी हातोड्याने वार करून खून केल्याची माहिती मुंबईच्या पायधुनी पोलिस ठाण्याने दिली आहे. हत्येची योजना काही दिवसांपासून तयार करण्यात येत होती. अर्शदची पत्नी रुखसानाचे आरोपी जय प्रवीण चावडाशी अनैतिक संबंध होते. दोघांमध्ये अडसर ठरत असलेल्या अर्शदला मार्गातून हटवण्यासाठी दोघांनी कट रचला होता. यासाठी जयने त्याचा मित्र शिवजितची मदत घेतली. त्यांनी अर्शदला पार्टीसाठी बोलावलं, त्याला दारू पाजवली आणि त्याला जास्त नशा झाल्यावर हातोड्याने वार करून त्याची हत्या केली.

बॅग उचलता आली नाही आणि डाव फसला...

अर्शदची हत्या करण्यासाठी मारेकऱ्यांनी लाइव्ह व्हिडिओ कॉलद्वारे तीन लोकांची मदत घेतली, त्यापैकी एक बेल्जियमचा असल्याचे सांगण्यात येत आहे. हत्या केल्यानंतर जय आणि शिवजीतने अर्शदचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून तो सुटकेसमध्ये भरला आणि ते दादर स्टेशनवर पोहोचले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तुतारी एक्सप्रेसने प्लॅटफॉर्म नं. 11 वरून जाणार होते. मात्र बॅग जड असल्याने त्यांना ती उचलता आली नाही. रेल्वे पोलिसांना संशय आला आणि त्यांच्याजवळ जात असताना त्या दोघांनी तेथून पळ काढला मात्र त्यांना उल्हानगर येथून पोलिसांनी ताब्यात घेतलं. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आल्यानंतर विशेष गुन्हे शाखेने अधिक वेगाने तपास सुरू केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT