world championship chess 2024 Saam tv
मुंबई/पुणे

World Championship Chess 2024 : वर्ल्ड चॅम्पियन गुकेशला बक्षीस म्हणून किती रुपये मिळाले?

World Championship Chess 2024 News : गुकेशने जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत बाजी मारली. गुकेश जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. विजयानंतर गुकेशवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : १८ वर्षांच्या गुकेश डीने इतिहास रचला आहे. गुकेश हा जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता ठरला आहे. गुकेशने चीनच्या डिंग लिरेनचा पराभूत केले. गुकेशने ही स्पर्धा जिंकून विश्वविजेता ठरला आहे. स्पर्धा जिंकल्यावर गुकेशवर कौतुकाचा वर्षावर होत आहे. गुकेश हा या स्पर्धेचा सर्वात तरुण विजेता ठरला आहे. वर्ल्ड चॅम्पियन झाल्यानंतर गुकेशला कोट्यवधी रुपये मिळाले आहेत.

गुकेशने डाव जिंकल्यानंतर त्यांला आनंदाश्रू थांबवता आले. विश्वविजेता झाल्यानंतर गुकेशच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. २२ वर्षीय लीरेनच्या चालीवर लक्ष ठेवत गुकेशने डाव टाकण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही वेळात १८ वर्षीय गुकेशने चीनच्या २२ वर्षीय लीरेनला धूळ चारली. गुकेशने या स्पर्धेत रशियाच्या गॅरी यांचा विक्रम मोडला.

रशियाच्या गॅरी यांनी २२ व्या वर्षी जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकली होती. गुकेशच्या विजयाने तो भारतातील दुसरा जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील विश्वविजेता ठरला आहे. तर भारताच्या विश्वनाथन आनंद यांनी याआधी ५ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. या स्पर्धेत गुकेशने ७.५ -६.५ ने चीनच्या डिंग लिरनेला पराभूत केले. गुकेश हा वयाच्या १७ व्या वर्षी FIDE कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकली होती.

रिपोर्टनुसार, गुकेशने या स्पर्धेत २.५ मिलियन डॉलर म्हणजे १८ कोटी,८० लाख ६५ हजार ५०० रुपये इतकी कमाई केली आहे. गुकेशची संपत्ती ही ८.२६ कोटी इतकी होती. त्यात आता मोठी वाढ होणार आहे. गुकेशचा जन्म हा २९ मे २००६ रोजी चेन्नईमध्ये झाला. त्याने वयाच्या ७ व्या वर्षी बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली. गुकेशनला आंतरराष्ट्रीय खेळाडू भास्कर यांनी प्रशिक्षण दिलं. गुकेशचे वडील डॉक्टर आणि आई मायक्रोबायोलॉजिस्ट आहे.

दरम्यान, गुकेशने बाजी मारल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनंदन केलं आहे. राज ठाकरे यांनी 'एक्स' पोस्ट शेअर त्याचं अभिनंदन केलं आहे. राज ठाकरे म्हणाले,'गुकेश याने आज शब्दशः इतिहास घडवलाय. वयाच्या १८ व्या वर्षी डिंग लिरेनला पराभूत करून गुकेश विश्वविजेता ठरलाय. डी गुकेश आणि त्याच्या कुटुंबीयांचं आणि त्याच्या प्रशिक्षकाचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मनःपूर्वक अभिनंदन. कला, विज्ञान आणि खेळ यांचा अद्वितीय संगम असलेला बुद्धिबळाचा हा खेळ भारतात, महाराष्ट्रात वृद्धिंगत होऊ दे . हिंदुस्थानात जगजेत्यांची एक मोठी परंपरा निर्माण होऊ दे हीच इच्छा'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्य सरकारच्या ओबीसी विभागाची आज महत्त्वाची बैठक

Brain Health : मिल्कशेक आणि जंक फूड खाताय? मेंदूवर होतोय गंभीर परिणाम, जाणून घ्या धक्कादायक रिपोर्ट

Ballaleshwar Temple Pali : नाद करायचा नाय! पूजेचं साहित्य विकणाऱ्या मराठी व्यावसायिकचा दुकानात आलेल्या विदेशी पर्यटकांसोबत थाई भाषेतून संवाद; पर्यटक आवाक

OBC Reservation : मराठ्यांचं कुणबी प्रमाणपत्र रद्द होणार? वकील योगेश केदार यांनी सांगितली अडचण, आता नवी मागणी चर्चेत

Nepal Protest: नेपाळमधील हिंसक आंदोलनाचा उत्तर प्रदेशला फटका; जाणून घ्या काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT