
नवी दिल्ली : भारताने जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत इतिहास घडवला आहे. भारताचा सर्वात तरुण खेळाडू गुकेश डी हा वर्ल्ड चॅम्पियन ठरला आहे. गुकेश डीने चीनच्या डिंग लीरेनचा पराभव करून वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या किताबावर नाव कोरलं आहे. विश्वनाथ आनंद यांच्यानंतर गुकेशने जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत मोठा इतिहास घडवला आहे.
गुकेश हा विश्वनाथ आनंद यांच्यानंतर बुद्धिबळ स्पर्धेत सर्वात मोठा किताब जिंकणारा भारतीय ठरला आहे. वर्ल्ड चॅम्पियन झाल्यानंतर त्याच्या डोळ्यात आनंदअश्रू तरळले. जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत गुकेशने चांगला खेळ दाखवला. काही वेळा बॅकफूटवर गेलेल्या गुकेशने खेळात अनेकदा कमबॅक केले. लिरेन हा २०२३ साली रशियाच्या इयान नेपोमनियाचीविरोधात बाजी मारली होती. लिरेना हा २०२३ वर्ल्ड चॅम्पियन ठरला होता. यंदा गुकेशने त्याच्या पुन्हा चॅम्पियन होण्याच्या स्वप्नावर पाणी फेरलं. या वर्षी गुकेशने बाजी मारत युवा वर्ल्ड चॅम्पियन ठरला आहे.
गुकेशने पंधरा दिवस सुरु असलेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत कमाल केली आहे. गुकेशच्या आधी सर्वात तरुण म्हणून किताब जिंकण्याचा इतिहास रशियाच्या गॅरी कास्पारोव यांच्या नावावर होता. त्यांनी १९८५ साली अनातोली कार्पोव यांचा पराभवर करत अवघ्या २२ व्या वर्षी स्पर्धेचा किताब जिंकला होता. त्यानंतर आता गुकेश हा जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत विजयी होऊन विश्वनाथन आनंद यांच्यानंतर जिंकणारा दुसरा भारतीय ठरला आहे. पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन झालेल्या आनंद यांनी शेवटचा किताब २०१३ साली जिंकला होता.
गुकेशच्या वर्ल्ड चॅम्पियन सामन्याच्या स्पर्धेला मागील वर्षीच्या डिसेंबर महिन्यात सुरुवात झाली होती. त्यावेळी चेन्नईच्या ग्रँडमास्टर्स स्पर्धेत जिंकून कँडिडेट्स स्पर्धेत जागा निश्चित केली होती. कँडिटेट्स स्पर्धेत फाबियानो कारुआना आणि हिकारू नाकामुरा या दोघांची जोडी कमाल करणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, या दोघांनाही धूळ चारत गुकेश जगात नाव कमावलं आहे. या स्पर्धेत प्रज्ञानानंदानेही सहभाग नोंदवला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.