आरे कॉलोनीतून बिबट्याचं गोंडस पिल्लू नागरिकांकडून रेक्यु; व्हिडिओ व्हायरल... twitter/@sohitmishra99
मुंबई/पुणे

आरे कॉलोनीतून बिबट्याचं गोंडस पिल्लू नागरिकांकडून रेक्यु; व्हिडिओ व्हायरल...

बिबट्याचं हे पिल्लू त्याच्या आईपासून वेगळं झाल्याने रस्ता चुकलं आणि इथे पोहोचलं. आता त्याला वन-विभागाकडे सुपुर्द करण्यात आलयं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबईच्या आरे कॉलोनीतील नागरिकांना अनेकदा बिबट्याचं दर्शन घडत असतंं. मात्र यंदा बिबट्याच्या गोंडस पिल्लाचं दर्शन घडलं आहे. मेट्रोसाठी बनवण्यात आलेल्या कारशेडच्या जागेवर एका पत्र्याजवळ हे पिल्लू आढळलं. हे पिल्लू त्याच्या आईपासून वेगळं झाल्याने रस्ता चुकलं आणि याठिकाणी पोहोचलं. पावसात भिजल्याने ते थंडीने कुडकुडत होतं. ही बाब स्थानिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी बोरीवली नॅशनल पार्कमधील वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. तोपर्यंत नागरिकांनी त्या पिल्लाला ऊब मिळावी म्हणून एका चादरीत गुंडाळले होते. या पिल्लाला वन-विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे सुपुर्द करण्यात आलं असून त्याच्या आईचा शोध घेतला जाणार आहे. या गोंडस पिल्लाचे फोटोज् आणि व्हिडिओज् प्रचंड व्हायरल होत आहे. (Cute little Leopard rescue from Aarey Colony by citizen; Video viral ...)

हे देखील पहा -

मुंबईतील आरे मिल्क कॉलोनी याठिकाणी फडणवीस सरकारच्या काळात मेट्रोचे कारशेड उभारण्यात येत होते. मात्र याठिकाणची जैवविविधता आणि पर्यावरणाला धोका निर्माण झाल्याने स्थानिकांनी आणि पर्यावरण प्रेमींनी या बांधकामाला तीव्र विरोध केला होता. या आदोलनात बॉलिवुड अभिनेत्री श्रद्धा कपूरही सामील झाली होती. जनतेचा कौल पाहता शिवसेनेने आपली सत्ता आल्यावर आरे कॉलोनीला जंगल घोषीत करण्याचे वचन दिले होते. त्यानुसार मविआ सरकार स्थापन झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कॉलोनीतील मेट्रो कारशेड प्रकल्प रद्द करुन आरे ला संरक्षित जंगल म्हणून घोषीत केले होते.

विशेष म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आरे जंगल आहे का? असा सवाल उपस्थित करत मेट्रो कारशेडचे जोरदार समर्थन करत कामही सुरु केले हाते. यावरुन तेव्हा युतीत असलेले शिवसेना आणि भाजपमध्ये मतभेद उघड झाले होते. मुंबईतलं आरेचं जंगल हे अतिशय दाट आणि प्राणीसंपदेने समृद्ध आहे. या भागात विविध प्रकारचे प्राणी, पक्षी आणि किटक सापडतात. जगातून संपण्याच्या मार्गावर असलेली रस्टी स्पॉटेड कॅट म्हणजे जगातील सर्वात लहान मांजरही इथं सापडते. बिबट्यांचा इथं मुक्तसंचार आहे. त्यामुळे ठाकरे सरकारनं या जागेला वन विभागाकडे सुपुर्द केलं हाेतं.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT