Mumbai Gold Smuggling Case Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News: नूडल्सचे पॅकेट अन् अंतरवस्त्रात सापडलं कोट्यवधींचं घबाड; मुंबई विमानतळावर मोठी कारवाई

Gold Smuggling Case: मुंबई विमानतळावरून (Mumbai Airport) नूडल्सचे पॅकेट आणि अंतरवस्त्रातून सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती कस्टम विभागाला मिळाली होती.

Satish Daud

Mumbai Latest Crime News

मागील काही दिवसांपासून देशभरात सोने तस्करीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सोने आणि हिऱ्यांची तस्करी करण्यासाठी आरोपी वेगवेगळ्या आयडिया शोधून काढत आहेत. दुसरीकडे कस्टम विभागाचे अधिकारीही सतर्क असून सोन्याची तस्करी करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या जात आहे. अशातच मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने सोमवारी (ता. २२) मोठी कारवाई केली आहे.

मुंबई विमानतळावरून (Mumbai Airport) नूडल्सचे पॅकेट आणि अंतरवस्त्रातून सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती कस्टम विभागाला मिळाली होती. माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी संशयितांची झाडझडती घेतली. यावेळी आरोपींकडे २५४.७१ कॅरेटचे नैसर्गिक हिरे आणि प्रयोगशाळेत केलेले ९७७.९८ कॅरेट असे एकूण २ कोटी रुपयांचे हिरे आढळून आले.

याशिवाय आरोपींकडे ४.४ कोटी रुपयांचे ६.८ किलो सोनेही सापडले. या हिरे तसेच सोन्याची नूडल्सचे पाकिट आणि अंडगारमेंटमधून तस्करी (Gold Smuggling) केली जात होती. याप्रकरणी कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ४ आरोपींना अटक केली आहे.

जप्त करण्यात आलेल्या हिरे तसेच सोन्याची एकूण किंमत सुमारे ६ कोटी ४६ लाख रुपये आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एवढ्या मोठ्या प्रमाणात जप्त केलेले सोने बाहेरुन विमानाने तस्करी करण्यात येत होते.

सध्या मुंबई विमानतळ कस्टम विभागाचे अधिकारी चारही आरोपींची कसून चौकशी करीत आहेत. सध्या सोन्याच्या तस्करीची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या महिन्यात, सीमाशुल्क विभागाच्या पथकाने दोन मोठ्या तस्करीच्या प्रकरणांमध्ये दुबई येथून आणले जाणारे कोट्यवधी रुपयांचे सोने जप्त केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bareli Protest : बरेलीत नमाजावेळी मोठा गोंधळ, शेकडो आंदोलक रत्यावर उतरले; पोलिसांचा लाठीचार्ज

Vastu Tips Of Lighting Diya: घरात या दिशेला ठेवू नये पेटता दिवा, ओढवेल मोठं संकट

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

SCROLL FOR NEXT