Mumbai Airport Saam tv
मुंबई/पुणे

Gold Smuggling In Mumbai: पॅनकेक पावडरमधून सोन्याची तस्करी; मुंबई विमानतळावरून १.३७ कोटींचे सोने जप्त, कस्टम विभागाची कारवाई

Vishal Gangurde

सचिन गाड, मुंबई

Mumbai Crime News:

मुंबई विमानतळावरून सोने तस्करी करणाऱ्यांवर महसूल गुप्तचर संचलनालयाने मोठी कारवाई केली आहे. महसूल गुप्तचर संचलनालयाने १ कोटींहून अधिक किंमतीची सोने तस्करी रोखली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावर पॅनकेक पावडरमधून सोन्याची तस्करी करणाऱ्यांच्या कस्टम विभागाने मुसक्या आवळल्या आहेत. कस्टम विभागाच्या पथकाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर १.३७ कोटी रुपयांची सोने जप्त केले आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तस्करांकडून पॅनकेक पावडरमधून सोन्याची पूड मिश्रित करून तस्करी सुरू होती. चेक-इन बॅगेचे पाईप तसेच कपड्यातूनही सोन्याची तस्करी सुरू होती. पाच विविध प्रकरणांमध्ये एकूण २.४८ किलो सोने जप्त कारवाई केली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर डिझेल तस्करीचा भांडाफोड

मुंबई-गोवा महामार्गावर पेण जवळ तरण खोप इथं सुरू असलेल्या डिझल तस्करीचा रायगड पोलिसांनी भांडाफोड केला आहे. पोलिसांनी तब्बल पावणे दोन कोटी रुपयांचे चोरीचे डिझेल आणि सहा टँकर हस्तगत केले आहेत. या प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी या प्रकरणी जहीर लब्बे, महमद अली वहाब, महमद रियाज अन्सारी अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणातील अद्याप सहा साथीदार अद्याप फरार आहेत. या प्रकरणी पेण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यात मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Rain Alert : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय, मराठवाडा-विदर्भात जोरदार पाऊस होणार; या जिल्ह्यांना अलर्ट

Rashi Bhavishya today : मनातील भावना जोडीदाराला शेअर कराल; तुमची रास यात आहे का?

Horoscope Today : भाग्य फळफळणारा आजचा दिवस, मामाच्या संमिश्र गोष्टी कानावर येतील; तुमच्या नशिबात काय लिहिलंय? वाचा

Dombivli Politics : मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच विरोधात बॅनरबाजी, प्रकरण थेट पोलिसांत पोहोचलं

Mumbai Crime : पार्किंगवरून भांडण, महिलेकडून विनयभंगाच्या गुन्ह्याची धमकी; भीतीपोटी वृद्धाने संपवले आयुष्य

SCROLL FOR NEXT