Bhiwandi Crime News: धक्कादायक! चेहऱ्यावर गुंगीची पावडर फुंकून महिलेला लुटलं, भिवंडीतील घटनेने खळबळ

Bhiwandi Crime News: शहरातील धामणकर नाका येथे बँकेतून पैसे काढून रिक्षासाठी उभ्या असलेल्या महिलेच्या चेहऱ्यावर गुंगीची पावडर फुंकून लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Bhiwandi Crime News
Bhiwandi Crime NewsSaam Digital

Bhiwandi Crime News

शहरातील धामणकर नाका येथे बँकेतून पैसे काढून रिक्षासाठी उभ्या असलेल्या महिलेच्या चेहऱ्यावर गुंगीची पावडर फुंकून लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चोरट्याने महिलेचे २९ हजार रुपये लाबंवले आहेत. याप्रकरणी अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक कोलते प्रकरणाचा तपास करत आहेत.

सालीयाबानो शहा यांनी पंजाब नॅशनल बँकेतून २९ हजार रुपये काढले होते. पैसे घेऊन घरी जाण्यासाठी त्या कल्याण नाका ते धामणकर नाका हद्दीतील गोल्डन हॉस्पिटलजवळ उभ्या होत्या. तेव्हा दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्याजवळ येऊन गुंगीची पावडर फुंकली. यामुळे शहा यांना चक्कर आली. ही वेळ साधून चोरांनी त्यांच्याकडील पैसे घेऊन त्याजागी हातात नोटांच्या आकाराचे कागद ठेवले. शहा शुद्धीवर आल्यानंतर त्यांना पैसे चोरल्याचे लक्षात आले. तेव्हा त्यांनी शहर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bhiwandi Crime News
Viral Video: चक्क कैद्यांनी दिला पोलिसांच्या बंद पडलेल्या वाहनाला धक्का, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

नागपुरात व्यापाऱ्याच्या घरावर सिनेस्टाईल दरोडा

मागील काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. किरकोळ कारणावरून गोळीबारासारख्या गंभीर घटना घडत आहेत. दुसरीकडे झटपट पैसा कमवण्याचा नादात काहीजण चोरी तसेच दरोड्यासारख्या घटना घडवून आणत आहेत. असाच काहीचा प्रकार नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाणे परिसरात घडला. 

ओमनगर परिसरात (Nagpur News Today) फुलांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याच्या घरावर शनिवारी (३ फेब्रुवारी) रात्री पाच ते सहा आरोपींनी दरोडा टाकला. चाकूचा तसेच खंजीरीचा धाक दाखवत आरोपींनी घरातील आठ लाखांची रोकड लंपास केली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला आहे.

Bhiwandi Crime News
Wardha Crime: मंदिरात चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास अटक; कारसह लाखोंची रक्कम जप्त

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com