Viral Video: चक्क कैद्यांनी दिला पोलिसांच्या बंद पडलेल्या वाहनाला धक्का, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

Viral Video Prisoners Push Police Van: भागलपूर जिल्ह्यात आरोपींना न्यायालयात घेऊन जाणारी महिंद्रा स्कॉर्पिओ रस्त्याच्या मधोमध इंधन संपल्यामुळे बंद पडली. त्यानंतर पोलिसांनी या आरोपींनाच खाली उतरवून कारला धक्का द्यायला लावला आहे.
Viral Video
Viral VideoSaam Digital

Viral Video News

बिहारच्या पोलिसांवर नामुष्की ओढवणारा एक प्रसंग घडला आहे. भागलपूर जिल्ह्यात चार आरोपींना न्यायालयात घेऊन जाणारी महिंद्रा स्कॉर्पिओ रस्त्याच्या मधोमध इंधन संपल्यामुळे बंद पडली. धक्कादायक म्हणजे या कारमधून आरोपींना न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जात असताना हा प्रकार घडला असून चक्क या आरोपींना कार ढकलायला लावण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे बिहारच्या पोलिसांना चांगलंच ट्रोल केलं जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एका गंभीर गुन्ह्यात अटक केलेल्या चार आरोपींना घेऊन पोलीस विभागाचे वाहन कोर्टाकडे निघाले होते. यावेळी अचानक कचहारी चौकाजवळ स्कार्पिओ बंद पडली. त्यामुळे कारमधील कैद्यांना पोलिसांनी बाहेर काढले आणि कार ला धक्का देऊन रस्त्यातील कार बाजूला केली. यावेळी कैद्यांचे हात दोरीने बांधल्याचं व्हिडिओत दिसत आहे. एक पोलीस कर्मचारी कार चालवत आहे तर दुसरा कारला धक्का देणाऱ्या कैद्यांवर नजर ठेवताना दिसत आहे. कैद्यांनी वाहन 500 मीटरपेक्षा जास्त ढकलल्याची माहिती आहे.  फस्ट बिहार झारखंड

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांच्या तावडीतून आरोपी पळून गेल्याच्या अनेक घटना घडल्या असून त्यापैकी बहुतांश आरोपी न्यायालयात हजर होत असताना पळून जातात. ही परिस्थिती चिंताजनक असून या घटनेला जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

Viral Video
Viral Video: दारुच्या नशेत तरुणाचा भररस्त्यात धिंगाणा; बाईक चालकालाही मारहाण, पाहा VIDEO

या घटनेनंतर संबंधित पोलिसांवर कडक कारवाई करण्याचं आश्वासन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती आहे. आरोपींना कोर्टाकडे घेऊन जाण्याआधी त्यांनी वाहनाची तपासणी करण्याची गरज होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Viral Video
Viral Video: 'अरे देवा...' खिळे घेतले अन् चिवड्यासारखे खाऊन टाकले; व्हिडिओ पाहून नेटकरी अवाक्!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com