crop insurance saam tv
मुंबई/पुणे

Crop Insurance in 2023 : मोठी बातमी! राज्यातील शेतकर्‍यांना आता केवळ 1 रुपयांत पीकविमा

Maharashtra Budget Session: फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठीच्या मोठ्या योजनांची घोषणा केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Assembly Budget Session: महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसकल्प जाहीर केला आहे. फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठीच्या मोठ्या योजनांची घोषणा केली आहे. राज्यात आता शेतकर्‍यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा मिळणार आहे. (Latest Marathi News)

शिंदे सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शेतकऱ्यांसाठी घोषणांचा वर्षाव केला आहे. शेतकऱ्यांच्या विम्यासाठी देखील मोठी योजना आणली आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांना आता केवळ १ रुपयांत पीकविमा मिळणार आहे.

आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या २ टक्के रक्कम शेतकऱ्यांकडून (Farmers) घेतली जात होती. आता शेतकऱ्यांवर कोणताच भार राहणार नाही. त्यामुळे आता राज्य सरकार हप्ता भरणार आहे. यामुळे ३३१२ कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार आहे.

आता राज्य सरकारकडून गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना यापूर्वी विमा कंपन्यांकडून राबवली जात होती. मात्र, आता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना नावाने राज्य सरकारकडून राबविण्यात येईल. त्यामुळे शेतकर्‍यांचा पूर्ण त्रास वाचणार आहे. अपघातग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबांना पूर्वीच्या 1 लाखाहून आता 2 लाख रुपयांपर्यंत लाभ मिळणार आहे.

नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन

नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. 3 वर्षांत 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणण्यात येणार आहे. 1000 जैवनिविष्ठा स्त्रोत केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची व्याप्तीची वाढ करण्यात येणार आहे. 3 वर्षांत 1000 कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup : दक्षिण आफ्रिकाविरुद्धचा पराभव भोवणार, तिघांपैकी कुणाची विकेट पडणार? टीम इंडियात मोठा उलटफेर होणार

Shevgyachya Shenganchi Bhaji Recipe : भाकरी अन् झणझणीत शेवग्याच्या शेंगांची भाजी, एक घास खातच येईल गावाची आठवण

Maharashtra Live News Update: पुण्यात पाण्याच्या शोधात असणारा बिबट्या विहिरीत पडला

Seviyan Kheer Recipe: सणासुदीला घरी आलेल्या पाहुण्यासाठी झटरपट बनवा स्वादिष्ट शेवयाची खीर, वाचा सोपी रेसिपी

संतापजनक! बाथरूमच्या फलकावर लावला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो

SCROLL FOR NEXT