Maharashtra Budget 2023
Maharashtra Budget 2023SAAM TV

Maharashtra Budget: 'कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणार...' फडणवीसांचे आश्वासन; शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात 'या' मोठ्या घोषणा

Maharashtra Budget Session: महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे.

Maharashtra Budget 2023: महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. त्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या योजनांची घोषणा केली आहे. ज्यामध्ये त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे सांगितले आहे.

अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प पंचामृत ध्येयावर आधारित..

1) शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी

2) महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास

3) भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास

4) रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा

5) पर्यावरणपूरक विकास

Maharashtra Budget 2023
Maharashtra Budget 2023-24: राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, नमो शेतकरी योजनेद्वारे वार्षिक 12000 रुपये मिळणार

कृषी क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या मोठ्या घोषणा...

 • कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहणार

 • एकात्मिक पीक आधारित आराखडा तयार करणार

 • नमो शेतकरी महासन्मान योजना फडणवीसांकडून जाहीर झाली आहे.

 • १ कोटी १५ लाख शेतकऱ्यांना फायदा मिळणार

 • येत्या तीन वर्षात सेंद्रीय शेतीला प्राधान्य दिले जाणार

 • बुलढाण्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र

 • शेतकऱ्यांच्या नुकसानीचे इ-पंचनामे होणार

 • शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या ६ हजार रूपयांमध्ये आणखी ६ रूपयांची वाढ राज्य सरकारकडून केली जाणार आहे. यामुळे आता शेतकऱ्यांकडून वर्षाकाठी १२ हजार रूपये मिळतील.

 • शेतकऱ्यांच्या विम्याचा हफ्ता सरकार भरणार असल्याची मोठी घोषणा फडणवीसांनी केली. यासाठी शेतकऱ्यांना फक्त एक रूपया भरावा लागणार असून शासनातर्फे यावर ३३१२ कोटी रूपये खर्च केले जाणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली.

Maharashtra Budget 2023
Unseasonal Rain: शेतकऱ्यांची चिंता वाढली; विदर्भात येत्या १४ ते १७ मार्चदरम्यान वादळी पावसाचा अंदाज
 • धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १५ हजार रुपयांची मदत

 • शेततळे योजनेचा विस्तार करणार

 • गोपीनाथ मुंडे अपघात योजना सुरू करणार

 • अपघातग्रस्त शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची मदत

 • सेंद्रीय शेतीसाठी एक लाख कोटी रुपयांची तरतूद

 • बुलढाण्यात संत्रा प्रकल्प प्रक्रियेसाठी ३० कोटींची तरतूद

 • काजू प्रक्रिया उद्योगासाठी १ हजार ३५४ कोटींचं अनुदान (Maharashtra Budget)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com