Maharashtra Budget 2023-24: राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, नमो शेतकरी योजनेद्वारे वार्षिक 12000 रुपये मिळणार

Namo Shetkari Mahasanman: पंतप्रधान कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर टाकली आहे.
Budget for Farmer
Budget for Farmer Saam TV

Assembly Budget Session: राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता वर्षिक 12000 रुपयांचा सन्माननिधी मिळणार आहे.

पंतप्रधान कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर टाकली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार आणि केंद्र सरकारचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार आहेत. (Latest News)

सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ मिळणार आहे. या योजनेचा 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार आहे.

Budget for Farmer
Maharashtra Budget Session: अवकाळी पावसानं शेतकऱ्याला रडवले; विधानसभेत सत्ताधारी-विरोधक एकमेकांवर बरसले

नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन

नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 3 वर्षांत 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणलं जाणार आहे. 1000 जैवनिविष्ठा स्त्रोत केंद्र स्थापन केली जाणार आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची व्याप्तीही वाढवली जाणार आहे. यासाठी 3 वर्षांत 1000 कोटी रुपये निधीची तरतूद केली जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com