bhagat singh koshyari and sudhanshu trivedi  saam tv
मुंबई/पुणे

राज्यपाल भगत सिंह कोशयारी आणि खासदार सुधांशू त्रिवेदींना वादग्रस्त वक्तव्य भोवणार? मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल

महाराष्ट्राचे राज्यापाल भगत सिंह कोशयारी आणि भाजप खासदार सुधांशू त्रिवेदींविरोधात मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल करण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

रश्मी पुराणिक

Maharashtra Political News : महाराष्ट्राचे राज्यापाल भगत सिंह कोशयारी आणि भाजप खासदार सुधांशू त्रिवेदींविरोधात मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि भाजप खासदार सुधांशू त्रिवेदींना वादग्रस्त वक्तव्य भोवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Latest Marathi News)

राज्यापाल भगत सिंह कोशयारी (Bhagat Singh Koshyari) आणि भाजप खासदार सुधांशू त्रिवेदी यांच्या विरोधात महापुरुषांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा ज्योतिबा फुले आणि मराठी माणसाचा अवमान केल्याप्रकरणी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. अनुसूचित जाती, जनजाती प्रतिबंधक अधिनियम 2015 (सुधारित) कलम 3 (1)(v) नुसार ही याचिका दाखल करण्यात आली आहे

राज्यपाल कोश्यारी आणि खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे अनुसूचित जातींसोबतच सर्वसामान्य लोकांचीही भावना दुखावल्याचा याचिकेतून आरोप करण्यात आला आहे. लवकरच या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. याचिकाकर्ता रमा अरविंद यांच्या वतीनं वकील अमित कटारनवरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाफेडने मांडला कांदा खरेदीचा खेळ; पहिल्याच दिवशी फज्जा, बळीराजाची थट्टा

Malpua Recipe: घरच्या घरी बनवा खमंग आणि गोड मालपुआ, वाचा सोपी रेसिपी

Samir Choughule: समीर चौघुले घेऊन येतोय नात्यांचा गोडवा; 'साखर खाल्लेला माणूस'ची प्रदर्शन तारीख जाहीर

राज्यात बोगस शाळांचा सुळसुळाट; बोगस शाळांची यादी 'साम टीव्ही'च्या हाती

Fact Check : 200 च्या नोटेवर अब्दुल कलाम? व्हायरल फोटोमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT