Pune: गुन्हेगाराचा पोलिसांवर हल्ला अधिकाऱ्यांचा हवेत गोळीबार, पहा Video Saam TV
मुंबई/पुणे

Pune: गुन्हेगाराचा पोलिसांवर हल्ला अधिकाऱ्यांचा हवेत गोळीबार, पहा Video

येरवडा पोलिसांचे एक पथक गुरुवारी रात्री शक्‍ती सिंह यास पकडण्यासाठी गेले होते.

अमोल कविटकर, पुणे

पुणे : येरवडा येथे एका सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर जमावाने हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी स्वत:च्या संरक्षणासाठी हवेत गोळीबार केल्यानंतर जमाव पांगला. ही घटना गुरुवारी रात्री साडे साडेनऊ वाजता येरवडा येथील कोतेवस्ती येथे घडली. येरवडा येथील कोते वस्तीमध्ये धर्मसमभाव नावाची म्हाडा वसाहत आहे. स्थानिक रहिवाशांना तेथील शक्‍ती सिंह नावाचा सराईत गुन्हेगार आणि त्याचे साथीदार त्रास देत होते. याप्रकरणी नागरिकांनी येरवडा पोलिस (Police) ठाण्यात तक्रार दिली होती.

त्यानुसार, येरवडा पोलिसांचे एक पथक गुरुवारी रात्री शक्‍ती सिंह यास पकडण्यासाठी गेले होते. त्यावेळी सिंह याने समाजातील नागरिकांना पोलिसांविरुद्ध भडकावले. सिंह याचे ऐकून समाजातील नागरिकांनी थेट पोलिसांवरच हल्ला चढविला. त्यामध्ये एका पोलिस अधिकाऱ्यासह पोलिस कर्मचारी देखील जखमी झाले. या घटनेनंतर पोलिसांनी स्वत:च्या संरक्षणार्थ पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. त्यानंतर नागरिकांचा जमाव पांगला आणि अखेर पोलिसांनी शक्‍ती सिंह यास अटक केली.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पुणे महापालिकेत बैठक

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

9 IPS अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री बदल्या; पोलिस दलात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

Pune Politics: ज्येष्ठ नेत्यांवर टीका, भाजपच्या जिव्हारी, पुणे महापालिकेतील निधी रोखल्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

Shivsena Dispute : ...तर ठाकरे-शिंदे एकत्र येऊ शकतात; शिंदेसेनेच्या बड्या नेत्याचं भाकित, EXCLUSIVE

SCROLL FOR NEXT