Crime : भिवंडीत माथेफिरूच्या चाकू हल्ल्यात दोघांचा मृत्यू; चार जण जखमी! फय्याज शेख
मुंबई/पुणे

Crime : भिवंडीत माथेफिरूच्या चाकू हल्ल्यात दोघांचा मृत्यू; चार जण जखमी!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- फय्याज शेख

मुंबई : भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील खान कंपाऊंड गैबी नगर येथील रहेमनीया मस्जिद परिसरातील एका चाळीत राहणाऱ्या परिवारावर एक माथेफेरूने केलेल्या चाकू हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी आहेत. त्यामध्ये एक मयताची पत्नी व तीन मुलांचा समावेश आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. अन्सार उलहक्क अन्सारी असे हल्ला करणाऱ्या माथेफेरूचे नाव असून या हल्ल्यात कमरुजमा मोहम्मद इस्लाम वय 42 व इम्तियाज अहमद मोहम्मद जुबेर खान वय 29 या दोघांची हत्या झाली आहे.

हे देखील पहा :

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार शुक्रवार असल्याने दुपार च्या नमाज पूर्वी सर्व घरात असताना सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास माथेफेरू आरोपी अन्सार उलहक्क अन्सारी याने कमरुजम्मा मोहम्मद इस्लाम अन्सारी याच्या घरात शिरून चाकूने त्यावर हल्ला केला असता घरात आरडाओरडा झाल्यानंतर शेजारी राहणारा इम्तियाज अहमद मोहम्मद जुबेर हा त्याठिकाणी आला असता माथेफेरूने त्यावर व घरातील कमरुजमा ची पत्नी हसीनाबानो, मुले रेहान, आरिफा व आरीबा यांच्यावर सुध्दा चाकू हल्ला करीत सर्वांना जखमी करीत रक्तबंबाळ केले.

हल्ल्यानंतर आरोपी परिसरातील आपल्या घरात गेला असता या गदारोळा नंतर परिसरातील नागरीक धावून येत त्यांनी हल्लेखोर असलेल्या घराला बाहेरून कडी लावून कोंडून ठेवत या घटनेची माहिती शांतीनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी अन्सार उलहक्क अन्सारी यास त्याच्या घरातून पकडून ताब्यात घेतले. तर नागरीकांनी सर्व जखमींना स्व.इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी कमरुजमा मोहम्मद इस्लाम व इम्तियाज अहमद मोहम्मद जुबेर खान हे मयत झाल्याचे घोषित केले.

तर, जखमी पत्नी व मुलांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात रवाना केले आहे. या हत्त्येच्या गुन्ह्याची नोंद शांतीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, आरोपी अन्सार उलहक्क अन्सारी हा परिसरातील मशिदींसाठी देणगी जमा करण्याचे व हिशोब ठेवण्याचे काम करीत असल्याचे व त्यांच्यात यापूर्वी कोणत्यातरी कारणावरून वाद झाला असल्याची माहिती परिसरातील नागरिक देत आहेत. या घटनेनंतर आमदार महेश चौघुले हे रुग्णालयात दाखल होत त्यांनी आरोपीस कठोरात कठोर शासन करण्याची मागणी केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : राज्यात मतदार यादी घोटाळा? 'मतदारांची नावं वगळण्याचा कट', भाजपवर मविआचे गंभीर आरोप

Maharashtra Politics: 'उद्धव ठाकरेंकडूनच AB फॉर्म घेणार', दारात उभ्या निष्ठावंतांसाठी मुलगा सरसावला; मातोश्रीतील बैठकीतला इमोशनल मोमेंट?

Maharashtra News Live Updates: शरद पवार गटाची सोमवारी ८० उमेदवारांची यादी जाहीर होणार

Mumbai Local train : मध्य रेल्वेवर मोठा अपघात! लोकलचा डबा रुळावरून घसरला; प्रवाशांचे हाल

Eknath Shinde : CM शिंदे थोडक्यात बचावले; हेलिकॉप्टरची करावी लागली इमर्जन्सी लँडिंग, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT