Pune Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News : क्षुल्लक कारणावरुन तरुणाला अर्धनग्न करत बेदम मारहाण, पुण्यातील धक्कादायक घटना

Crime News : नऱ्हे परिसरात राहणाऱ्या एका २८ वर्षीय तरुणाने पोलिसांना फिर्याद दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

Pune News : तरुणाला अर्धनग्न करत बेदम मारहाण केल्याची घटना पुण्यातून समोर आली आहे. बदनामी करत असल्याच्या गैरसमजातून तरुणाला ही मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी पीडित तरुणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात रविवारी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी याप्रकरणी राहुल व्यवहारे, शिवंकर कडू यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत नऱ्हे परिसरात राहणाऱ्या एका २८ वर्षीय तरुणाने पोलिसांना फिर्याद दिली आहे.

सदर घटना १४ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळच्या सुमारास घडला. फिर्यादी हा आपली बदनामी करतो आहे, असे राहुल व्यवहारे आणि शिवणकर कडू यांना वाटत होते. म्हणून आरोपींनी फिर्यादीला अर्धनग्न करून मारहाण केली. तसेच यापुढे इव्हेन्ट करायचा नाही, असे सांगून जीवे मारण्याची धमकी दिली. (Latest Marathi News)

अर्धनग्न अवस्थेत मारहाण करतानाचा व्हिडीओ काढून तो फिर्यादीच्या क्षेत्रातील लोकांना व्हाट्सअपवर पाठवला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  (Maharasthra News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Krishi Thapanda: धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी आढळला ३३ वर्षीय मित्राचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरू

Ambernath : अंबरनाथमध्ये तरुणावर हल्ला, पुतणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून काकाने काढला राग; ५ आरोपींवर गुन्हा

Ketan Agarwal Case: केतन अग्रवालच्या हत्येआधीचा धक्कादायक व्हिडीओ आला समोर, सिया अन् चेतन होते सोबत

संजय दिना पाटील यांची पत्रकारांना शिवीगाळ; मुख्यमंत्री काय म्हणाले? VIDEO

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात पावसाचे आगमन

SCROLL FOR NEXT