Kalyan News Saam TV
मुंबई/पुणे

Kalyan Crime News: आरपीएफ पोलीस उपनिरीक्षकाची काठीने मारहाण करत हत्या, कल्याणमधील खळबळजनक घटना

पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> अभिजीत देशमुख

कल्याण : कल्याण आरपीएफच्या उपनिरीक्षकाची आरपीएफच्या जवानाने हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे.बसवराज गर्ग असे मयत सब इन्स्पेक्टरचे नाव असून पंकज यादव असे आरोपीचे नावे आहे . दोन वर्षांपूर्वी पंकज यादव याचे एका प्रकरणात चौकशी करत त्याच्यावर कारवाई केली होती. या कारवाईचा राग मनात धरून त्याने ही हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली .

आरपीएफमध्ये बसवराज गर्ग सब इन्स्पेक्टर पदावर कार्यरत होते. कल्याण पूर्वेकडील सिद्धार्थनगर येथील रेल्वेच्या बॅरेकमध्ये ते राहत होते. काल रात्रीच्या सुमारास बसवराज हे आपल्या बॅरेकमध्ये मोबाईलवर गाणी ऐकत असताना त्या ठिकाणी अचानक आरपीएफ जवान पंकज यादव आला. त्याने हातातील लाकडी दांडक्याने व ठोशा-बुक्क्यांनी बसवराज यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. (Crime News)

या मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने बसवराज यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर पंकज यादवने त्या ठिकाणाहून पळ काढला व थेट पेण गाठले. याप्रकरणी कोळशेवाडी पोलिसांना माहिती मिळताच कोळशेवाडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात पंकज यादव विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू करण्यात आला.

पंकज हा पेण येथे लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ तेथे जात अवघ्या सहा तासात पंकजला बेड्या ठोकल्यात. दोन वर्षांपूर्वी आरपीएफ कार्यालयात पंकज याचे त्याच्या सहकाऱ्याशी वाद झाल्याने याबाबत वरिष्ठांना तक्रार केली होती. या तक्रारीच्या चौकशीनंतर वरिष्ठांनी पंकजवर कारवाई करत त्याची इन्क्रिमेंट थांबवली होती.

या कारवाईचा राग पंकजच्या मनात होता दोन वर्षापासून तो संधीच्या शोधात होता. अखेर काल त्याने बसवराज यांना गाठून त्यांची हत्या केल्याचे आता उघड झालं आहे. दरम्यान या चौकशी समितीमध्ये आणखी दोन जण सहभागी होते. त्यांच्या शोधात तो चिपळूणला जाणार होता. मात्र याआधीच पोलिसांनी त्याला अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT