Pune By-Election News: '...तर कसबा, चिंचवड पोटनिवडणूक रद्द होऊ शकते', अ‍ॅड. असिम सरोदेंनी सविस्तर सांगितलं

Election News: विधानसभा बरखास्त झाली तर कुठल्याही प्रकारच्या निवडणुकीचं आयोजन करता येत नाही, असंही असिम सरोदे यांनी म्हटलं.
Maharashtra Election
Maharashtra ElectionSaam tv
Published On

पुणे : कसबा(Kasaba) आणि चिंचवड(Chinchwad) पोटनिवडणुकीसाठी सर्वच पक्ष मैदानात उतरले आहेत. पोटनिवडणूक बिनविरोध होईल असं अनकांना वाटत असताना मात्र महाविकास आघाडीने तसं होऊ दिलं नाही. मात्र कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक रद्द होऊ शकते. कायदेतज्ज्ञ अॅड. असिम सरोदे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

राज्यात शिवसेनेत फूट पडल्यानंतर पक्षातील वाद सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. सुप्रीम कोर्टात 16 आमदारांच्या अपात्रतेच प्रकरण प्रलंबित आहे. उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या निर्णयाआधी सुप्रीम कोर्टाने अपात्र आमदारांचं प्रकरण निकाली काढवं, अशी विंनती केली.

Maharashtra Election
Congress News: नाना पटोलेंविरोधात काँग्रेसमध्ये एकजूट, दिल्लीत हालचालींना वेग

या मुद्द्यावरुन बोलताना असिम सरोदे यांनी म्हटलं की. कुठलही सरकार पाच वर्षांचं असतं. सर्वोच्च न्यायालयात 16 आमदार अपात्र ठरले तर राज्याची विधानसभा बरखास्त होईल. हे सरकार चुकीचं आहे असा निर्णय जर न्यायलयाने दिला तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल. अशा वेळेस कलम 172 नुसार विधानसभा टिकत नाही.

Maharashtra Election
Osmanabad News: शेतात पाणी भरायला गेलेल्या पिता-पुत्राचा शॉक लागून मृत्यू, नव्या घरात राहण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं

विधानसभा विसर्जित होते आणि विसर्जित झालेल्या विधानसभेची निवडणूक होत नाही. तसेच मतदानही होत नाही. विधानसभा बरखास्त झाली तर कुठल्याही प्रकारच्या निवडणुकीचं आयोजन करता येत नाही, असंही असिम सरोदे यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com