विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. वडगाव मावळमधील बावीस वर्षीय तरुणीने ब्लॅकमेलिंगला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी रणजित देशमुख व अभिषेक ढोरे दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांचा तिसरा साथीदार प्राण येवले हा फरार आहे. पीडित मुलीला आरोपी रणजित देशमुख आणि त्याचे मित्र तिचे कॅफेमधील खासगी फोटो व्हायरल करण्याची तसेच तिचं लग्न मोडण्याची धमकी देत होते. या त्रासाला कंटाळून पीडितेने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने पुणे शहर हादरलं आहे.
पुण्यातील वडगाव मावळमध्ये राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीने ब्लॅकमेलिंगला कंटाळून गळफास घेत स्वतःचे जीवन संपवले. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रणजित देशमुख सोबत पीडितेचे कॅफेमधील काही खासगी फोटो होते. पीडितेला रणजित हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता. यावेळी रणजितचे मित्र अभिषेक ढोरे व प्राण येवले हे देखील मुलीवर रणजीत सोबत मैत्री करण्याचा सतत आग्रह करीत होते. इतक्यावरच न थांबता या आरोपींनी पीडितेला तिचे लग्न मोडण्याची व आई वडिलांना मारून टाकण्याची धमकी देत होते.
हा सगळा प्रकार डिसेंबर २०२४ पासून सुरु होता. मात्र सततच्या जाचाला कंटाळून अखेर पीडितेने राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या मृत्यूनंतर कोलमडलेल्या कुटुंबीयांनी तडक पोलीस स्टेशन गाठून गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपस करून तरुणीच्या आत्महत्येमागचं कारण शोधून काढलं.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत वडगाव मावळ पोलिसांनी आरोपी रणजीत व त्याचा मित्र अभिषेक यांना अटक केली आहे. तर प्राण अद्याप फरार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत. तसेच या घटनेने पीडितेच्या कुटुंबाकडून आणि नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.