Kandivali Police Station Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: आईवरून चिडवताच तळपायाची आग मस्तकात गेली; ४३ वर्षीय व्यक्तीची मुलाने केली हत्या

43 year old man was killed by his 17 year old son: मुलाल ठेच लागताच आईच्या डोळ्यात जसं पाणी येतं त्याचप्रमाणे मुलाला देखील आईच्या प्रेमासाठी संपूर्ण जगाशी दोन हात करण्यास तयार असतो.

साम टिव्ही ब्युरो

सचिन गाड

Kandivali Crime News: मुंबईमधील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. प्रत्येक व्यक्तीला आपली आई प्रिय असते. आई विषयी कोणीही वाईट ऐकून घेऊ शकत नाही. नऊ महिने पोटात वाढवून आपल्याला जन्म देणाऱ्या आईशी प्रत्येक मुलाची नाळ जोडलेली असते. मुलाला ठेच लागताच आईच्या डोळ्यात जसं पाणी येतं त्याचप्रमाणे मुलाला देखील आईच्या प्रेमासाठी संपूर्ण जगाशी दोन हात करण्यास तयार असतो. अशाता मुंबईत आईवरून चिवडवल्याच्या रागातून एकाची हत्या झाली आहे. (Crime News)

मुंबईच्या कांदिवली परिसरात ही घटना घडली आहे. आईवरून चिडवल्याच्या रागातून तरुणाने एका व्यक्तीला बेदम मारहाण करत त्याची हत्या केली आहे. अब्दुलरहीम जैफुल मलिक असं मृत व्यक्तीचं नाव आहे. अब्दुल ४३ वर्षीय व्यक्ती असून अवघ्या १७ वर्षांच्या मुलाने त्याची हत्या केली आहे. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

स्क्रू ड्रायव्हरने केले वार

अब्दुलने मुलाच्या आईवरून त्याला चिडवलं होतं. याचा त्याला फार राग आला. आपल्या आईबद्दल अब्दुलने वापरलेले शब्द त्याच्या काळजात घाव करून गेले. त्याने पुढचा मागचा कसलाही विचार न करता स्क्रू ड्रायव्हरने अब्दुलच्या मानेवर आणि डोक्यात सपासप वार केले. कांदिवलीमधील इरणीवडी परिसरात ही घटना घडली आहे.

घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कांदिवली (Kandivali) पोलिसांनी या प्रकरणी मुलावर हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. तसेच त्याला ताब्यात घेण्यात आलं असून विधीसंघर्षग्रस्त बालकाची रवानगी डोंगरी बालसुधार गृहात करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात कुत्र्याला वाचविण्यासाठी अतिसाहस अंगलट

Anardana Pudina Chutney : पंजाब स्पेशल 'अनारदाना पुदिना चटणी', आंबट-गोड चव जेवणाची वाढवेल रंगत

Tsunami Warning : रशिया, जपान ते अमेरिका भूकंपाने हादरलं; आता १२ देशांना त्सुनामीचा अलर्ट, भारताला किती धोका?

Actress Arrested : अभिनेत्रीने दारूच्या नशेत २१ वर्षाच्या मुलाला कारने उडवले, जागेवरच मृत्यू

पंतप्रधान स्वतःला देवाचा अवतार समजतात; संजय राऊतांचा राज्यसभेत मोदींवर घणाघात | VIDEO

SCROLL FOR NEXT