Corona Patients in Mumbai Saam TV
मुंबई/पुणे

Covid JN.1 Variant : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा सामना करण्यासाठी BMC सज्ज, रुग्णालयांची सद्यस्थिती काय? पाहा आकडेवारी

Mumbai Corona News Update : मुंबईत कोरोना चाचण्या देखील वाढवल्या जाणार आहेत. खबरदारी म्हणून 16 महापालिका रुग्णालये, सेव्हन हिल्स रुग्णालयासह सुमारे साडेपाच हजार बेड तैनात ठेवण्यात येणार आहेत.

प्रविण वाकचौरे

आवेश तांदळे

Mumbai News :

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ‘जेएन.1’ देशभरात हळूहळू पाय रोवत आहे. मात्र वेगाने पसरणारा हा व्हेरिएंट असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. 11 राज्यांमध्ये नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले आहेत. मागील काही दिवसात कोरोना रुग्णांमध्ये वाढ नोंदवली गेली आहे.

मुंबईत देखील कोरोनाच्या रुग्णामध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. या पार्श्भूमीवर मुंबई महापालिका अलर्ट मोडवर आहे. मुंबईत डिसेंबरमध्ये आतापर्यंत आढळलेल्या सर्व 34 बाधितांची 'जिनोम सिक्वेन्सिंग' करण्यात येणार आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंबईत कोरोना चाचण्या देखील वाढवल्या जाणार आहेत. खबरदारी म्हणून 16 महापालिका रुग्णालये, सेव्हन हिल्स रुग्णालयासह सुमारे साडेपाच हजार बेड तैनात ठेवण्यात येणार आहेत.

कोरोनाच्या नवा व्हेरियंटची लक्षणे सौम्य आहेत. ओमिक्रोनचा हा सब व्हेरिएंट आहे. मुंबई महापालिकेने नव्या आव्हानाचा सामना करण्यासाठी सर्व तयारी केली आहे. महापालिका आयुक्तांनी देखील याबाबत आढावा घेतला. हॉस्पिटलमधील बेड्स, औषधे यांची उपलब्धता देखील तपासली आहे, अशी माहिती महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी दक्षा शहा यांनी दिली.  (Latest Marathi News)

मुंबई महापालिकेची बेड व्यवस्था

आयसोलेशन - 1276

ऑक्सिजन - 1108

आयसीयू - 441

व्हेंटिलेटर - 470

एकूण - 3295

सेव्हन हिल्स रुग्णालय

आयसोलेशन - 910

ऑक्सिजन - 620

आयसीयू - 320

व्हेंटिलेटर - 360

एकूण - 2210

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT