Bhimashankar Temple in Pune district sparked controversy after BJP MP Nishikant Dubey reportedly received special darshan despite the shrine being closed for devotees Saam Tv
मुंबई/पुणे

भाजप खासदारासाठी अडीच महिने बंद असलेले भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी केले खुले

Bhimashankar Temple Opens For Mp Nishikant Dubey: पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर मंदिर बांधकामामुळे अडीच महिन्यांपासून भाविकांसाठी बंद असताना भाजप खासदार डॉ. निशिकांत दुबे यांनी हेलिकॉप्टरने येऊन विशेष दर्शन घेतल्याचा आरोप होत आहे.

Omkar Sonawane

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर सध्या सुरू असलेल्या बांधकामामुळे अडीच महिन्यापासून सर्वसामान्य भाविकांच्या दर्शनासाठी बंद आहे. मात्र, झारखंडमधील भाजप खासदार डॉ.निशिकांत दुबे यांच्यासाठी प्रशासनाने सर्वच नियम धाब्यावर बसवले. शनिवार दिनांक १४ मार्च २०२६ रोजी दुपारी 2 वाजता दुबे कुटुंबीय आणि त्यांचे नातेवाईकांसह हेलिकॉप्टरने येऊन त्यांनी विशेष दर्शन घेतल्याने प्रशासनाच्या दुजाभावावर तीव्र संताप व्यक्त केला जातोय. भीमाशंकर मंदिराच्या सभामंडप आणि पायरी मार्गाच्या बांधकामामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हे मंदिर ९ जानेवारी ते ९ एप्रिल २०२६ या कालावधीत संपूर्ण बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.

स्थानिक नागरिक आणि भाविकांनी हा निर्णय स्वीकारला होता. नुकताच महाशिवरात्री उत्सवाला सुद्धा भाविकांसाठी मंदिर बंदच होते. अगदी पत्रकारांना सुद्धा या ठिकाणी मज्जाव केला होता. मात्र थेट हेलिकॉप्टरने आलेल्या खासदारांसाठी प्रशासकीय नियम पायदळी तोडून मंदिराचे दरवाजे उघडले गेल्याने खळबळ उडाली आहे.

भाजप खासदारांच्या या व्हीआयपी दर्शनाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी होत आहे. याबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणावर आश्चर्य व्यक्त केले आहे.

प्रशासनाकडून दर्शनासाठी कोणतीच अधिकृत परवानगी देण्यात आलेली नव्हती. या घटनेबद्दल मला कोणतीही माहिती नाही असे सांगत त्यांनी या प्रकरणापासून हात झटकले आहेत. त्यामुळे मंदिर प्रशासनाने नेमक्या कोणाच्या दबावाखाली हा निर्णय घेतलाय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. खासदार डॉ. निशिकांत दुबे हे झारखंडमधील गोड्डा मतदारसंघाचे खासदार असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्ती मानले जातात. निशिकांत दुबे केवळ या दर्शनामुळेच नव्हे तर त्यांच्या जुन्या वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्रात चर्चेत राहिलेत.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात त्यांनी राज ठाकरे आणि मराठी अस्मितेवर टीका करताना मराठी लोकांना 'पटक पटक कर मारेंगे' असे वादग्रस्त विधान करून त्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या होत्या. अशा वादग्रस्त नेत्यासाठी भीमाशंकर मंदिरात मात्र सर्व नियम पायदळी तुडवल्याने स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आशा भोसले यांना येवल्यातील पैठणीची भुरळ

Gold Rate: सोनं-चांदीने उच्चांक गाठला, आठवडाभरात किती रुपयांनी वाढले, वाचा १८, २२ आणि २४ कॅरेटचे आजचे दर

Success Story: शेतकऱ्याच्या लेकीची यशाला गवसणी, पहिल्याच प्रयत्नात महसूल सहाय्यक पदावर निवड

Who Is Zanai Bhosle: कोण आहे जनाई भोसले? आशा भोसले यांच्याशी आहे खास कनेक्शन

Stampede : चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू, ऐतिहासिक किल्ल्यावरील उत्सवात गदारोळ

SCROLL FOR NEXT