Kapil Sibal Saam Tv
मुंबई/पुणे

Kapil Sibal: आम्हाला जनतेचा काँग्रेस पक्ष पाहिजे, घराणेशाहीचा नको - कपिल सिब्बल

काँग्रेसच्या या दारुण पराभवामुळे काँग्रेसचे जुने नेते चिंतेत असून नेतृत्व बदलाची मागणी जोर धरतेय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: काँग्रेसचा पाच राज्यातील दारुण पराभव, नेतृत्व बदलाची मागणी, काँग्रेसमधून नेत्यांचे होणारे पलायन अशा अनेक मुद्द्यांवरुन आता काँग्रेसच्या जुन्या, ज्येष्ठ नेत्यांचा व्यथा समोर येत आहेत. आज जवळपास 130 वर्षांच्या इतिहासात काँग्रेसची अशी अवस्था केव्हा झाली नव्हती. काँग्रेसच्या या दारुण पराभवामुळे काँग्रेसचे जुने नेते चिंतेत असून नेतृत्व बदलाची मागणी जोर धरतेय. यावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनीही प्रतिक्रिया दिलीये (Congress Senior Leader Kapil Sibal Says we want a peoples Congress party not a dynastic one).

काँग्रेसमध्ये (Congress) सुधारणा करण्याची गरज आहे, अशी मागणी करणाऱ्या 23 नेत्यांमध्ये कपिल सिब्बल पहिले नेते आहेत. ज्यांनी सोनिया गांधी यांनी पायउतार व्हावे, असे उघड आवाहन केले होते. तसेच गांधी घराण्याने काँग्रेस नेतृत्वाचा भार सोडून दुसऱ्या नेत्याला जबाबदारी द्यावी, अशी मागणी देखील त्यांनी केलीये.

आम्हाला जनतेचा काँग्रेस पक्ष पाहिजे, घराणेशाहीचा नको

काही लोक काँग्रेसमध्ये आहेत, तर काही काँग्रेसच्या बाहेर आहेत. पण, खऱ्या काँग्रेससाठी आणि प्रत्येकाच्या काँग्रेससाठी काँग्रेसच्या बाहेरच्या व्यक्तीने ऐकले पाहिजे. काँग्रेसची ज्या प्रकारे अधोगती होत आहे, ते मला पाहवत नाही. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेससाठी लढत राहणार असल्याचे कपिल सिब्बल (Kapil Sibal) म्हणाले.

‘सबकी काँग्रेस म्हणजे केवळ एकत्र राहणे नव्हे, तर भारतातील ज्यांना भाजप (BJP) नको आहे, अशा सर्वांना एकत्र आणणे. आपल्याला असा दृष्टिकोन स्वीकारावा लागेल ज्यामध्ये या देशातील सर्व संस्थांच्या निरंकुश कारभाराच्या विरोधात असलेल्या परिवर्तनाच्या सर्व शक्तींनी एकत्र येणे आवश्यक आहे. ममता बॅनर्जी झाल्या, शरद पवार (Sharad Pawar) झाले, ते सगळे काँग्रेसवाले होते, पण सगळे गेले. या सर्वांना एकत्र आणायचे आहे', असंही ते म्हणाले.

नेतृत्वावर विश्वास ठेवणारे आज काँग्रेसमधून बाहेर पडताहेत - सिब्बल

‘सध्याच्या निवडणुकीच्या निकालाचे मला आश्चर्य वाटत नाही. 2014 पासून आम्ही सतत हरत आहोत. एकामागून एक राज्य आपण गमावत आहोत. आम्ही जिथे यशस्वी झालो तिथेही आम्ही स्वतःला एकत्र ठेवू शकलो नाही. आजही काँग्रेस नेत्यांचे पक्षांतर अव्याहतपणे सुरू आहे. नेतृत्वावर विश्वास ठेवणारे आज काँग्रेसमधून बाहेर पडत आहेत, हे खूप दुर्दैवी आहे. 2014 पासून आतापर्यंत सुमारे 177 संसद सदस्य आणि आमदार आणि 222 उमेदवारांनी काँग्रेस सोडली आहे. इतर कोणत्याही पक्षात एवढ्या मोठ्या संख्येने नेत्यांनी पक्ष सोडलेला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Diet: तुमच्या रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असणे महत्वाचे आहे? जाणून घ्या फायदे

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

Nanded News : लोहामध्ये मतमोजणी केंद्राबाहेर दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त वाढविला

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: लाडक्या बहिणीमुळे आमचा विजय - अजित पवार

Maharashtra Election Result: महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

SCROLL FOR NEXT