Eknath Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्यास कॉंग्रेस तयार

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांसह बंड केलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री बनवण्यास कॉंग्रेस तयार असल्याची माहिती आहे. यासंदर्भात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. राज्यात सुरू असलेल्या राजकीय नाट्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वी जनतेशी संवाद साधला होता. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंड केलेल्या आमदारांनी मला समोर येऊन सांगा, मी मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे, असं म्हटलं होतं. (Eknath Shinde Latest Marathi News)

आता या सर्व घडामोडीनंतर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायचं असेल तर त्याला कॉंग्रेसची कोणतीही हरकत नसेल, असं नाना पटोले यांनी सांगितलं आहे.

"मुख्यमंत्री जो निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर कॉंग्रेस आहे. सध्या आमचा विषय असा आहे की, जेव्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं तेव्हा आम्ही त्यांना सपोर्ट केला. आताही जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्याच पक्षाचा मुख्यमंत्री करत असतील आणि त्यासाठी कॉंग्रेस पक्षाची ते मदत मागत असतील तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत" असं नाना पटोले यांनी सांगितलं आहे.

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, "मुख्यमंत्री कुणाला करायचं हा उद्धव ठाकरे यांचा निर्णय आहे. त्याला आमची हरकत नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे की, आम्हाला भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं आहे. याशिवाय जर त्यांना दुसऱ्या पक्षासोबत सुद्धा जायचं असेल तर त्याला आमची काही जबरदस्ती नाही". असं नाना पटोले यांनी सांगितलं आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

'काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणाली आम्हाला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको आहेत ते बाहेरच्या पक्षातील आहेत समजू शकतो. आज सकाळी मला शरद पवार यांनी फोन केला होता, ते म्हणाले उद्धव आम्ही तुमच्यासोबत आहोत. हे बाहेरची माझ्यासोबत आहेत, मग माझ्याच माणसांना मी मुख्यमंत्री पदी का नको आहे. मग हे सगळ सांगण्यासाठी सुरतला का जावे लागते, बंडखोर केलेल्या एकाही आमदाराने मला समोर येऊन सांगाव मुख्यमंत्री तुम्ही नको, तर मी लगेच मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे, अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे, गुवाहटीला गेलेल्या आमदारांनी येऊन माझा राजीनामा घेऊन राजभवनात द्या. मला कोरोना झाला आहे म्हणून मी राजभवनात जाऊ शकत नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, नाना पटोले यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत कॉंग्रेसची भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Ticket Clerk : प्रवाशांची तिकिटासाठी मोठी रांग, तरीही बुकिंग क्लर्क फोनवर बिझी; संताप आणणारा व्हिडिओ

World Lung Cancer Day 2025: फुफ्फुसाचा कर्करोग झाल्यास सुरूवातीला काय लक्षणं दिसतात? वेळीच व्हा सावध

Konkan Railway: ट्रेनमधून कार कोकणात न्यायचीय? कसं कराल बुकिंग, किती लागेल शुल्क? जाणून घ्या सर्व काही

Income Tax Return: करदात्यांसाठी आनंदाची बातमी! आता आयटीआरचा परतावा काही तासांत येणार

Maharashtra Live News Update: - बदलापूर रेल्वे स्थानकात बसवले जुनेच सरकते जिने

SCROLL FOR NEXT