Congress Saam TV
मुंबई/पुणे

Congress MLA Cross Voting: विधानपरिषदेत क्रॉस व्होटिंगनंतर काँग्रेसकडून मोठी कारवाई होणार; पक्षाचा आदेश न पाळणारे ५ आमदार कोण? VIDEO

Vishal Gangurde

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग प्रकरणानंतर काँग्रेस पक्ष अॅक्शन मोडमध्ये आला आहे. क्रॉस व्होटिंग प्रकरणी ५ आमदारांवर कारवाई करण्याचे निर्देश मल्लिकार्जुन खरगे यांनी दिले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या ५ आमदारांवर कारवाईची टांगती तलवार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणे ५ काँग्रेस आमदारांना भोवण्याची शक्यता आहे. निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या ५ आमदारांवर काँग्रेस पक्षाकडून कारवाईची शक्यता आहे. 5 आमदारांवर कारवाई करण्याचे निर्देश काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी दिल्याची माहिती हाती सूत्रांकडून मिळाली आहे. तर २ आमदारांबाबत पुन्हा चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कोणत्या ५ आमदारांवर कारवाई होणार?

क्रॉस व्होटिंग केल्यावरून ५ आमदारांवर कारवाई होणार आहे. या आमदारांमध्ये झिशान सिद्दीकी ,सुलभा खोडके ,हिरामण खोसकर, जितेश अंतापूरकर ,मोहन हंबिर्डे यांचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे.

काय आहे प्रकरण?

विधानपरिषदेच्या निवडणुकीत अपेक्षित कोटा आमदारांना देण्यात आला होता. मात्र, अपेक्षित कोटा पक्षाला मिळालेला नाही. त्यात ७ आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचं स्पष्ट झालं होतं. या आमदारांपैकी ५ जणांवर कारवाईचे निर्देश देण्यात आले होते. तसे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी निर्देश दिले आहे. या संदर्भात नाना पटोले यांनी वरिष्ठांची भेट घेतली होती. या प्रकरणी या ५ आमदारांवर लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. या संदर्भात २२ जुलैपर्यंत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, काँग्रेसकडून या पाच आमदारांवर काय कारवाई केली जाते, हे पाहावे लागेल. काँग्रेसकडून गुरुवारी एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या आमदारांना बडतर्फ करण्याची शक्यता आहे. तसेत त्यांची ६ वर्षांसाठी कारवाई केली जाऊ शकते. काँग्रेसकडून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडक कारवाईचा संदेश दिला जाऊ शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: संजय राऊतांनी सांभाळून बोलावं : बच्चू कडू

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

Maharashtra Politics : अजित पवारांची सावध भूमिका, १० टक्के मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवणार?

Dharangaon News : पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली पण बाहेर आलाच नाही; तरुणाचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT