Rahul Gandhi Saam TV
मुंबई/पुणे

Rahul Gandhi News: राहुल गांधींची खासदारकी का रद्द झाली? काँग्रेस नेत्यानेच नेमकं काय ते सांगितलं

Reason Of Rahul Gandhi Disqualification: राहुल गांधींवर झालेल्या कारवाईनंतर देशभरातील काँग्रेस नेत्यांना याबाबत निषेध नोंदवला आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News: राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना काल सूरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आज त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. मात्र राहुल गांधींवर झालेल्या कारवाईनंतर देशभरातील काँग्रेस नेत्यांना याबाबत निषेध नोंदवला आहेत.

राज्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं की, राहुल गांधी यांच्यावरील कारवाई हा लोकशाहीवर हल्ला आहे. भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढली आहे. तसेच ते भाजपला विविध मुद्द्यांवरुन घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. (Latest Marathi News)

म्हणूनच राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे राहुल गांधी देखील घाबरणार नाहीत. हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू झाल्याचा हा पुरावा आहे, असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.

देशाच्या परंपरेला तिलांजली देण्याच काम- अजित पवार

कोणाची खासदार घालवण्याचा प्रयत्न झालेलं आतापर्यंत पाहिलं नव्हतं. या घटनेचा आम्ही धिक्कार करतो. देशाच्या परंपरेला तिलांजली देण्याच काम या माध्यमातून होत आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.

आता आम्ही चोर नाही तर डाकू म्हणू- नाना पटोले

राहुल गांधी यांनी कर्नाटकात ललित मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्याबद्दल वक्तव्य केलं होतं. संविधान संपवण्याचं काम सुरू आहे. आता आम्ही चोर नाही तर डाकू म्हणू. आम्ही रस्त्यावर उतरून लढाई लढू, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Couples In Hotels: गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडनं एकत्र हॉटेलमध्ये राहणं गुन्हा आहे का?

Maharashtra Rain Live News : - राष्ट्रवादी शरद पवार गटाची मंडल यात्रा जालन्यात दाखल

Bus Accident : बस- ट्रकचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, पारोळा- भडगाव रस्त्यावरील घटना

Shocking : मिठाईचं आमिष दाखवतं झुडपात नेलं; अंगणवाडीत गेलेल्या ५ वर्षीय चिमुकलीवर १५ वर्षीय मुलाकडून लैंगिक अत्याचार

Jui Gadkari: जुई गडकरीचा मराठमोळा अंदाज; फोटो पाहून सौंदर्याचं कौतुक

SCROLL FOR NEXT