Rahul Gandhi News: कॉंग्रेसला धक्का! राहुल गांधींची खासदारकी रद्द; काय आहे संपूर्ण प्रकरण?

Rahul Gandhi Disqualified: कॉंग्रेससह राहुल गांधींसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे...
Rahul Gandhi
Rahul GandhiSaam TV
Published On

Rahul Gandhi Defamation Case: देशाच्या राजकारणातून सध्या एक मोठी बातमी समोर येत आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. सुरज न्यायालयाने हा सर्वात मोठा निर्णय दिला आहे. कॉंग्रेससह राहुल गांधींसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. मोदी आडनावाबद्दल केलेल्या विधानावरुन ही कारवाई करण्यात आली आहे. जाणून घेवूया काय आहे हे संपूर्ण प्रकरण. (Latest Marathi News)

Rahul Gandhi
Talegaon Dabhade : माेठ्या थकबाकीदारांवर कारवाई सुरु, तळेगावातील सहा मोबाईल टॉवरला पालिकेने ठोकले टाळे

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आहेत. सुरत न्यायालयाने त्यांना काल (23 मार्च) दोन वर्षांची शिक्षा सुनावल्याने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 10 जुलै 2013 च्या निकालानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

Rahul Gandhi
Climate Change Alert : 2000 वर्षात असं कधीच घडलं नाही; आता नद्याही आटणार, शेती सोडा पिण्यासाठीही पाणी उरणार नाही

काय आहे संपूर्ण प्रकरण...

राहुल गांधीनी कर्नाटकमध्ये प्रचारादरम्यान राहुल गांधींनी मोदी आडनावावरुन टीका केली होती. राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. त्यानंतर काल (23 मार्च) त्यासंदर्भात सूरतच्या जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान राहुल गांधींना दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. राहुल गांधींनी जामीनासाठी अर्ज केला.

राहुल गांधीचा जामीनही मंजूर झाला आहे. मात्र, या शिक्षेची अंमलबजावणी 30 दिवसांसाठी स्थगित करण्यात आली. तसेच उच्च न्यायालयात जाण्यासाठी कोर्टाने राहुल गांधींना 30 दिवसांचा वेळ दिला आहे. त्यानंतर आज लोकसभा सचिवालयाने मोठी कारवाई करत राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. (Congress)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com