Chandrapur politics  Saam tv
मुंबई/पुणे

ऐन महापालिका निवडणुकीत काँग्रेसने भाकरी फिरवली; राजकारणात दिला सर्वांनाच आश्चर्याचा धक्का

chandrapur political news : ऐन महापालिका निवडणुकीत काँग्रेसने भाकरी फिरवली आहे. या निर्णयाने राजकारणात सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

संजय तुमराम

चंद्रपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसची मोठी खेळी

चंद्रपुरात काँग्रेसने भाकरी फिरवली

चंद्रपुरात वंचित बहुजन आघाडीची कारवाई

चंद्रपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसने आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच सगळेच उमेदवार नवीन दिले आहेत. एकही चेहरा पुन्हा दिलेला नाही. यातही नव्वद टक्के उमेदवार हे स्नातक किंवा त्यापेक्षा अधिक शिकलेले आहेत. काँग्रेसवर नेहमीच टीका केली जायची की, त्याचत्याच चेहऱ्यांना संधी दिली जाते. याचा अनेकदा फटकाही पक्षाला बसल्याचे दिसून आले.

तीन-तीन चार-चार टर्म नगरसेवक राहिलेल्या लोकांनाच उमेदवारी दिली जाणार असेल, तर नवे आणि सुशिक्षित चेहरे राजकारणात कसे येतील, असा प्रश्न उपस्थित केला जायचा. हा प्रश्न तसा सर्वच पक्षांना लागू होत असला तरी त्यात सुधारणा करण्याचे प्रयत्न आजवर फार कमी झाले. काँग्रेसने यावेळी पहिल्यांदाच आश्चर्यकारक भूमिका घेत सर्व जुने चेहरे बाजूला सारले. प्रसंगी विरोधही सहन करावा लागला. मात्र पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने या विरोधाला न जुमानता नव्या आणि युवा चेहऱ्यांना संधी दिली.

काँग्रेस इथे 63 जागा लढवत आहे. यातील तीन जागा सोडल्या तर इतर सर्व ठिकाणी सुशिक्षित आणि नवीन उमेदवार दिले. यामुळे राजकारणात येऊ पाहणाऱ्या सुशिक्षित युवकांना एक आशा देण्याचे काम पक्षाने केले, अशी प्रतिक्रिया हे उमेदवार देत आहेत. शिकलेल्या तरुणांना संधी देण्याची भूमिका स्थानिक पातळीवर घेण्यात आली असून त्यांना वाव देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या.

चंद्रपुरात वंचित बहुजन आघाडीची मोठी कारवाई

चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची ठाकरे गटासोबत युती झालेली आहे. या शहरातील प्रभाग क्र. 07- जटपुरा ही जागा ठाकरे गटाच्या उमेदवारासाठी वंचित बहुजन आघाडीने सोडली आहे. असे असताना वंचित बहुजन महिला आघाडी चंद्रपूर महानगर शहर महासचिव मोनाली पाटील यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन बंडखोरी करीत शरद पवार गटाकडून उमेदवारी दाखल केलेली आहे.

मोनाली पाटील यांनी केलेली कृती पक्षाची शिस्तभंग करणारी आहे. यामुळे त्यांनी केलेल्या पक्ष विरोधी कारवाया बद्दल, त्यांना पदमुक्त करून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे, असे वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरेंच्या मनसेचे २ उमेदवार गायब? राजकीय वर्तुळात खळबळ

कल्याणमध्ये मोठी राजकीय घडामोड; दोन दिग्गज नेत्यांची एकत्र बैठक, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

ऐन निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; बड्या नेत्याचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'

Ladki Bahin eKYC: थर्टी फर्स्टची डेडलाईन तरी ई-केवायसी सुविधा सुरूच; लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक घोळ?

Friday Horoscope : नव्या वर्षाचा पहिला शुक्रवारी ठरेल लकी; जुळणार प्रेमाच्या रेशीम गाठी, ५ राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार

SCROLL FOR NEXT