तेजस्वी घोसाळकरांच्या विरोधात ठाकरे गटाची मोठी खेळी; जुन्या मैत्रिणीला रिंगणात उतरवलं, चुरशीची लढत होणार

tejaswini ghosalkar news : तेजस्वी घोसाळकरांच्या विरोधात ठाकरे गटाची मोठी खेळी खेळली आहे. घोसाळकर यांच्या विरोधात त्यांच्या खास मैत्रिणीला रिंगणात उतरवलं आहे.
tejaswini ghosalkar news
tejaswini ghosalkar news Saam tv
Published On
Summary

महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात

भाजपच्या उमेदवार घोसाळकर यांच्या विरोधात ठाकरे गटाची खेळी

ठाकरे गटाकडून धनश्री कोलगे यांना उमेदवारी

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला अधिकृत सुरुवात झाली आहे. मुंबईच्या दहिसर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २ सध्या विशेष चर्चेत आलाय. कारण या प्रभागात एकेकाळी मैत्रीण असलेल्या तेजस्वी घोसाळकर आणि धनश्री कोलगे आता एकमेकांविरोधात थेट मैदानात एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकल्या आहेत. या प्रभागातून भाजपकडून तेजस्वी घोसाळकर, तर शिवसेना ठाकरे गटाकडून धनश्री कोलगे यांना उमेदवारी देण्यात आलीये.

tejaswini ghosalkar news
महायुती फुटली! भाजप आणि शिंदे गटाला मोठा धक्का; रामदास आठवलेंनी कुठून कोणता उमेदवार उतरवला?

ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळालेल्या धनश्री कोलगे यांनी या लढतीचं वर्णन “निष्ठावंत विरुद्ध गद्दार,  'टीव्हीवरील चेहरा विरुद्ध रस्त्यावर काम करणारा चेहरा” आणि “बाहेरचा उमेदवार विरुद्ध स्थानिक उमेदवार” अशा शब्दांत केलंय. मी गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागात काम करतेय. माझा जनतेशी थेट संपर्क आहे, असा दावा देखील धनश्री यांनी केलाय.

tejaswini ghosalkar news
झटपट पटापट! फोन येताच भाजपच्या कोणत्या नेत्यांनी भरला उमेदवारीचा अर्ज? पुण्यातील यादी आली समोर

घोसाळकर कुटुंबीयांचा मुद्दा चर्चेत

तेजस्वी घोसाळकर या ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत. त्यामुळे हा मुद्दाही निवडणुकीत चर्चेचा ठरलाय. मात्र यावर धनश्री कोलगे म्हणाल्या, 'तेजस्वी घोसाळकर या घोसाळकर कुटुंबातील सून आहे, परंतु माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा आम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. त्यांनी आमच्यावर कधीही अविश्वास दाखवलेला नाही.'.

tejaswini ghosalkar news
Wednesday Horoscope : नवीन वर्षांत मालामाल व्हाल; ५ राशींच्या लोकांचा संपत्तीचा मार्ग मोकळा होणार

स्थानिक राजकारण तापणार

धनश्री कोलगे यांनी साम टीव्हीशी बोलताना हे स्पष्ट केलंय की, निवडणुकीत व्यक्तीपेक्षा कार्य, निष्ठा आणि स्थानिक प्रश्न महत्त्वाचे ठरणार आहेत. प्रभाग २ मध्ये विकासकामे, नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि स्थानिक प्रश्नांवरच ही निवडणूक लढवली जाईल' तत्पूर्वी, प्रचार सुरू होताच दोन्ही उमेदवारांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. मैत्रीपासून सुरू झालेली ही कहाणी आता थेट राजकीय संघर्षात बदलल्याने दहिसर प्रभाग २ मधील निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com