kunal kamra  Saam tv
मुंबई/पुणे

Kunal Kamra : 'ठाण्याची रिक्षा, चेहऱ्यावर दाढी...', कुणाल कामराचं एकनाथ शिंदेंवर गाणं; संजय राऊतांकडून ट्वीट, शिंदे गटाचा इशारा

Kunal Kamra Song on eknath shinde : कुणाल कामराने एकनाथ शिंदेंवर गाणं तयार केलं. ते गाणं कामराने सादर केलं. यावरून राजकारण तापलं आहे. त्याचं गाणं संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे.

Vishal Gangurde

कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कविता सादर करेली आहे. कविता सादर करत कामराने एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. कुणाल कामराचा कविता सादर करतानाचा व्हिडिओ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट केला आहे. कुणाल कामराच्या कवितेमुळे शिंदे गट आक्रमक झाला आहे.

महाराष्ट्रात तीन वर्षांपूर्वी घडलेल्या राजकीय घडामोडींवर कुणालने कविता करून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. 'शिवसेना भाजप पक्षामधून बाहेर आली. पुढे शिवसेना शिवसेनेतून बाहेर आली. त्यानंतर राष्ट्रवादी राष्ट्रवादीतून बाहेर आली. एका मतदाराला ९ बटन दिलं. यामुळे सर्व संभ्रमात पडले. एकाने पक्ष चालू केला होता. ते खूप मोठा जिल्हा ठाणे, तिथून येतात, असा टोला कुणालने कवितेतून लगावला आहे.

'यांचं हे राजकारण आहे. त्यांना घराणेशाही संपवायची होती. त्यामुळे कुणाचा बाप चोरून घेतला. आता काय रिप्लाय असेल? मी उद्या तेंडुलकरच्या मुलाला भेटू का, त्याला सांगतो चल भाई जेवण करुयात. त्याच्या वडिलांचं कौतुक करतो आणि सांगतो, भाई तुझा बाप आजपासून माझा बाप, असा मिश्किल टोला कामराने लगावला.

कुणाल कामराच्या कवितेचा व्हिडिओ संजय राऊत यांनी ट्विट केला आहे. कुणाल की कमाल. जय महाराष्ट्र, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. कुणाल कामराच्या कवितेनंतर शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. कुणाल कामराने व्हिडिओ मागे न घेतल्यास त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा शिंदे गटाने दिला आहे. कुणाल कामराच्या कवितेनंतर शिंदे गटाने शोच्या सेटची तोडफोड केली आहे. दुसरीकडे आमदार मुरजी पटेल यांनी कुणाल कामराच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विलास घुले मृत्यू प्रकरण तापलं! खासदाराच्या मुलाला अटक करा नाहीतर...; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण

'गुंगी गुडिया'ला धनंजय मुंडेच जबाबदार? सुनील तटकरेंनी मुंडेंचे कान टोचले

कुणबी नोंदींचा वाद पुन्हा पेटणार, 4 लोकप्रतिनिधींचे कुणबी प्रमाणपत्र अवैध

संजय शिरसाटांचं मंत्रिपद धोक्यात? इतर 3 मंत्र्यांवरही टांगती तलवार? मोठी खळबळ

राज्यात अ‍ॅनालॉग पनीरवर बंदी, ग्राहकांची कृत्रिम पनीरपासून सुटका

SCROLL FOR NEXT