kunal kamra  Saam tv
मुंबई/पुणे

Kunal Kamra : शिंदे गटाला झटका, कुणाल कामराला कोर्टाचा दिलासा, कोर्टात नेमकं काय झालं?

Kunal Kamra Gets Relief from Bombay High Court : शिंदे गटाच्या तक्रारीवरून दाखल गुन्ह्यात स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून दिलासा दिला. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि टीकेच्या मर्यादेवर न्यायालयात चर्चा.

Bharat Mohalkar

kunal kamra vs eknath shinde : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक गाणे सादर केल्याप्रकरणी स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. कामराविरुद्ध दाखल एफआयआर रद्द करण्यासाठी आणि अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी त्याने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना, न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत त्याच्यावर अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना दिले. या प्रकरणात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि राजकीय टीका यांच्यातील सीमारेषेवर चर्चा सुरू असून, कामराला मिळालेल्या अंतरिम संरक्षणामुळे शिंदे गटाला धक्का बसला आहे. कोर्टात नेमकं काय घडलं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....

गाणं जिव्हारी लागल्याने शिंदे गटाने कुणाल कामराविरोधात मोर्चा उघडला. आधी कामराने स्टँड अप कॉमेडी केलेल्या हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड केली. आणि त्यानंतर कामराविरोधात खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.. मात्र याच प्रकरणात उच्च न्यायालयाने शिंदे गटाला मोठा झटका दिलाय...मात्र कोर्टात काय घडलं? पाहूयात...

कोर्टात नेमकं काय घडलं?

फेब्रुवारी 2023 अजित पवारांकडूनही गद्दार शब्दाचा वापर, कामराच्या वकिलांचा युक्तीवाद

एका व्यक्तीला घाबरवण्यासाठी यंत्रणांचा गैरवापर सुरु

ज्यांची बदनामी झाली आहे त्यांनी तक्रार केली नसल्याचा युक्तीवाद

बहीणीवरुन शिवी देणं ही कॉमेडी नाही, सरकारी वकिलांचा दावा

त्यामुळे कामराच्या अटकेची गरज

तुम्ही चेन्नईला जाऊन जबाब घेऊ शकता का?, कोर्टाचा सवाल

ही अभिव्यक्तीची गळचेपी, कामराच्या वकिलांचा दावा

अंतिम निर्णय येऊस्तोवर अटकेपासून संरक्षण- कोर्ट

कुणाल कामराने शिंदेंवर विडंबन गीत केल्यानंतर तो तामिळनाडूला गेल्याचं स्पष्ट झालं.. तसंच खार पोलीसांनी वारंवार नोटीस पाठवूनही कामरा हजर झाला नाही. मात्र दरम्यान कामराने मद्रास हायकोर्टातून दिलासा मिळवला.. तर आता तीन तासांच्या .युक्तीवादानंतर मुंबई उच्च न्यायालयानेही कामराला अटकेपासून संरक्षण दिलंय.. त्यामुळे आता शिंदे गट काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Gold Rate: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, १० तोळ्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण, आजचे दर किती?

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Mumbai Police News : आलिशान कारमधून आले अन् टपरी चालकाला उचलून नेलं, मुंबईतील २ पोलिसांना बेड्या

Maharashtra Politics: मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का, मराठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश|VIDEO

Abhijeet Khandkekar Wife: फेसबुकवर मैत्री नंतर लग्न केलं; कोण आहे अभिजीत खांडकेकरची पत्नी?

SCROLL FOR NEXT