Ulhasnagar Saam
मुंबई/पुणे

Ulhasnagar: मावळनंतर उल्हासनगरचा पूल कोसळला; ५०० जणांचा संपर्क तुटला, पूल खचला पण..

Ulhasnagar Bridge Collapse: उल्हासनगरमधील गणेश नगर भागात नाल्यावरचा पूल कोसळला. ५०० हून अधिक घरांचा मार्ग बंद. सीसीटीव्हीत घटना कैद. महापालिकेच्या हलगर्जीपणावर स्थानिकांचा संताप.

Bhagyashree Kamble

मावळमधील कुंडमळातील पूल कोसळल्याची घटना ताजी असतानाच उल्हासनगरमध्येही पूल कोसळल्याचं समोर आलं. उल्हासनगरच्या कॅम्प ५ मधील गणेश नगर भागात नाल्यावरील पूल कोसळला असून, याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. पूल कोसळल्यामुळे ५०० घरांच्या येण्या जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. मात्र, पुलाचा वापर करणाऱ्या सुमारे ५०० पेक्षा अधिक घरांचा संपर्क मुख्य रस्त्याशी तुटला आहे.

उल्हासनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून संततधार पावसाला सुरूवात झाली आहे. नाले, नद्या दुथडी भरून वाहत आहेत. उल्हासनगरच्या कॅम्प ५ मधील गणेश नगर भागातही पावसाने काही उसंत घेतलेली नाही. दरम्यान, सतत पडणाऱ्या पावसामुळे गणेशनगर भागातील पूल कोसळला आहे.

सुदैवाने कुणीही त्या पुलावरून जात नव्हतं. यामुळे जिवितहानी टळली. मात्र, पूल कोसळल्याने ५०० हूनअधिक घरांचा येण्या-जाण्याचा रस्ता बंद झाला आहे. या पुलाची मागील काही वर्षांपासून दुरावस्था झाली होती. मात्र उल्हासनगर महापालिकेनं त्याकडे दुर्लक्ष केल्यानं रविवारी सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास हा पूल कोसळला.

ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फुटेजमध्ये पुलाचा काही भाग क्षणात कोसळत असल्याचं दिसत आहे. स्थानिक नागरिकांनी या घटनेनंतर महापालिकेविरोधात संताप व्यक्त केला असून, हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप केला जात आहे.

या पुलाची अवस्था गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत खराब झाली होती. पुलाचा काही भाग जीर्ण झाला होता. अनेक वेळा तक्रारी करूनही उल्हासनगर महानगरपालिकेकडून दुरुस्ती किंवा पुनर्बांधणीसाठी कोणतीच ठोस पावले उचलण्यात आली नव्हती, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कफन चोरांचा सरदार म्हणू का? उद्धव ठाकरेंचा वार, फडणवीसांचा प्रहार | VIDEO

Suranache Kaap Recipe : रोज भाजी खाऊन कंटाळलात? झटपट बनवा कुरकुरीत सुरणाचे काप

Maharashtra Politics : मराठीच्या मुद्द्यानंतर आता मनसेचा थेट बीएमसीवर हल्लाबोल; पक्षातील नेत्यांचा थेट 'खळखट्याक'चा इशारा

Maharashtra Live News Update: स्नेहा झंडगे आत्महत्या प्रकरण; आरोपींना १६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

Solapur News: उसाचं बिल थकलं, युवा शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळलं, न्यायासाठी कुटुंबियांनी फोडला टाहो

SCROLL FOR NEXT